मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान या दोघांनी एकत्रपणे 'मैने प्यार किया','हम आपके है कौन', साजन, जानम समझा करो, हम तुम्हारे है सनम हे चित्रपट केले आहेत. या दोघांची पडद्यामागेही चांगली मैत्री होती. त्याचा एक किस्सा समोर आला आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 'मैने प्यार किया' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.
'मैने प्यार किया' हा सलमान खानचाही मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट होता. याआधी त्याने 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती.
या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमानला असं कळालं होतं की, लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपटातील सुपरस्टार आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर आपला टिकाव लागणार नाही. त्यामुळे तो त्यांना घाबरून असायचा. नंतर लक्ष्मीकांत यांनी त्याला समजवलं आपलं व्यवस्थित बोंडिंग झालं नाही तर आपले सीन व्यवस्थित होणार नाहीत त्यानंतर त्यांच्यात चांगली गट्टी जमली होती.
त्यानंतर त्या दोघांनी 'हम आपके है कौन', साजन, जानम समझा करो, हम तुम्हारे है सनम, असे काही चित्रपट केले.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी एका मुलाखतीत सलमान आणि लक्ष्मीकांत यांच्या मैत्रीचा एक मजेशीर किस्सा सांगितला.
'हम आपके हैं कौन' या चित्रपटाच्या सुटिंगदरम्यान सलमान खान आणि अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या.
एका गाण्याच्या शूटिंगसाठी सलमान 'सलवार ड्रेस' मध्ये सेटवर आला होता. यावेळी "क्या रे संगिता का ड्रेस पेहनके आया है क्या " असं म्हणत लक्ष्मीकांत यांनी सलमानची चेष्टा केली होती.
लक्ष्मीकांत नेहमीच सलमानला संगीता बिजलानीच्या नावाने चिडवत असत, पण सलमानने या चेष्टेचा कधीही राग मानला नाही.
लक्ष्मीकांत आणि सलमान या दोघांत नेहमी चित्रपटाच्या सेटवर चेष्टा- मस्करी चालायची, असंही प्रिया बेर्डे यांनी यावेळी बोलताना सांगितले.