बॉलीवूडमध्ये गाजलेल्या प्रेमप्रकरणाबाबत बोलायचे झाल्यास ऐश्वर्या आणि सलमान यांच्या नात्याचे नाव सगळ्यात वर आहे. जेवढी चर्चा या नात्याची झाली त्याहून जास्त चर्चा त्यांच्या ब्रेकअप आणि त्यानंतरच्या हाय व्हॉल्टेज ड्राम्याची झाली. पण मधल्या काळात सलमानने ऐश्वर्याच्या एका सिनेमावर अशी काही टिप्पणी केली की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. (Latest Entertainment News)
सलमानने ऐश्वर्याच्या सिनेमाबाबत अत्यंत कडवट शब्दात टीका केली होती. सलमान म्हणतो की कोणी 'कुत्राही हा सिनेमा बघायला गेला नाही...…’ या सिनेमात ऐश्वर्या होती हे महत्त्वाचे कारण असले तरी सलमानचा त्या सिनेमावरचा राग असण्याचे आणखी एक कारणही होते.
सलमानने खिल्ली उडवलेल्या ऐश्वर्याच्या त्या सिनेमाचे नाव होते गुजारिश. संजय लीला भन्साळीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. हा सिनेमा 2010 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होते.
एका इवेंट दरम्यान सलमानला या सिनेमाबाबत विचारले गेले. तेव्हा सलमान म्हणतो, 'या सिनेमासाठी थिएटरमध्ये एक मच्छर तरी होता का?’ यानंतर तो म्हणतो, ‘तो सिनेमा बघायला कुत्रेही गेले नव्हते'. अर्थात गुजारिश बॉक्स ऑफिसवर फारसा प्रभाव पाडू शकला नव्हता.
सलमानला या सिनेमासाठी कास्ट न केले जाणे हे याचे मुख्य कारण मानले जात आहे. सलमान आणि संजय लीला भन्साळी यांचे घनिष्ट संबंध आहेत. सलमान गुजारीशसाठी खूप उत्साहित होता पण भन्साळीनी त्याला कास्ट केले नाही. पण ऐश्वर्यासोबत त्यांनी हृतिकची निवड केल्याने सलमान त्यांच्यावर नाराज असल्याचे समोर आले होते.