Salim Khan Hospitalised instagram
मनोरंजन

Salman Khan Father Salim Khan Hospitalised | अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान मुंबईत रुग्णालयात दाखल

Salman Khan Father Salim Khan Hospitalised | अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान मुंबईत रुग्णालयात दाखल

स्वालिया न. शिकलगार

सलमान खान यांचे वडील आणि ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही

Salman Khan Father Salim Khan Hospitalised

सुपरस्टार सलमान खानचे वडील पटकथा लेखक सलीम खान यांना मंगळवारी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. सलमान, त्याची बहीण अलविरा आणि मेहुणा अतुल अग्निहोत्री रुग्णालयात भेट घेण्यासाठी पोहोचले. मंगळवारी दुपारी रुग्णालयाबाहेर पापाराझींच्या कॅमेरामध्ये त्यांचे कुटुंबीय स्पॉट झाले.

मीडिया रिपोर्टनुसार, ९० ‍वर्षांचे सलीम खान यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिंदी सिने विश्वातील सर्वात प्रभावशाली लेखकांपैंकी एक त्यांना मानले जाते.

हिट जोडी सलीम-जावेद

सलीम खान यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सत्तरच्या दशकात सलीम - जावेद यांची जोडी हिट होती. दोघांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. ‘जंजीर’, ‘डॉन’, ‘दीवार’ असे काही त्यांचे खास चित्रपट आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT