Salim Khan Health Update instagram
मनोरंजन

Salim Khan Health Update | 'सलीम खान यांची प्रकृती ठिक', डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट; सोमी अलीची हृदयस्पर्शी पोस्ट समोर

Salim Khan Health Update | 'सलीम खान यांची प्रकृती ठिक', डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूड स्टार सलमान खान यांचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांना अचानक तब्येत बिघडल्यामुळे लीलावती हॉस्पिटल, मुंबई मध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीम खान यांना उच्च रक्तदाबामुळे मेंदुत रक्तस्त्राव झाला आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे,

सलमान खानचे सलीम खान यांना प्रकृती बिघडल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ४ वेगवेगळ्या डॉक्टर्सची टीम उपचार करत आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट समोर आली आहे. डॉ. जलील पारकर यांनी मीडियाला सांगितले की, दिग्गज लेखक सलीम खान यांची प्रकृती आता बरी आहे.

१८ फेब्रुवारी रोजी डॉ. जलील पारकर यांनी सांगितले की, ते 'ठीक' आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यामागील कारण देखील त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सलीम खान यांना उच्च रक्तदाबामुळे दाखल करण्यात आल्यापासून सुरक्षेचा उपाय म्हणून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मेंदूत सौम्य रक्तस्राव झाला होता, ज्याच्या उपचारासाठी एक विशेष प्रक्रिया अवलंबण्यात आली. त्यांचा रक्तदाब जास्त होता. त्यांची प्रकृती बिघडू नये म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. आम्ही आवश्यक असलेल्या तपासण्या केल्या. त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.'

मीडिया रिपोर्टनुसार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता सलीम खान यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. खान कुटुंबाचे डॉक्टर डॉ. संदीप चोप्रा यांनी त्यांना आपत्कालीन विभागात आणले होते.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सलमान, हेलेन, सलमा खान, अलविरा अग्निहोत्री, अर्पिता खान, अरबाज, शूरा खानसह संपूर्ण कुटुंब त्यांना भेटायला आले. दरम्यान, संजय दत्त आणि जावेद अख्तर सलीम खान रुग्णालयात दिसले.

सोमी अलीची भावनिक पोस्ट व्हायरल

सलमानची तथाकथित गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तिने म्हटले की, ''सलीम खान रुग्णालयात दाखल झाल्याचे ऐकून माझे हृदय पिळवटून गेले. जगासमोर, ते एक दिग्गज लेखक आहेत ज्यांनी अमिताभ बच्चन सारख्या महान व्यक्तींना घडवण्यास मदत केली आणि शोले सारखा उत्कृष्ट चित्रपट सह-निर्मित केला. माझ्यासाठी ते पित्यासारखे होते. त्यांच्या घरात राहून, मला मुलीसारखे वागवले जात असे, टेबलावर एकत्र बसून जेवत असू. श्रद्धेबद्दल खोलवर चर्चा केली जात असे, जिथे सर्व धर्मांचा आदर केला जात असे आणि त्यांचे कौतुक केले जात असे.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT