पुढारी ऑनलाईन डेस्क - 'सन मराठी' वाहिनीवर लवकरच 'सखा माझा पांडुरंग' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच सोशल मीडियाद्वारे या मालिकेचा टिझर प्रेक्षकांसमोर आला. पहिल्यांदाच महिला संत सखुबाई यांच्या जीवनावर आधारित मालिका येत आहे. महाराष्ट्र राज्यातील थोर भक्तांमध्ये संत सखुबाई यांची गणना केली जाते. समोर आलेल्या टीझरमध्ये विठ्ठलासह एक लहान मुलगी दिसत आहे. त्यानुसार संत सखुबाई यांच्या बालपणापासून या जीवनचरित्राची सुरुवात होणार असल्याचं दिसून येत आहे.
मालिकेत संत सखुबाई यांच्या भूमिकेत कोणती बालकलाकार दिसणार? त्याचबरोबर 'सन मराठी' संत सखुबाई यांच्या काळातील गोष्ट छोट्या पडद्यावर कशी मांडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते.