पुढारी ऑनलाईन
दिग्दर्शक अश्विनी अय्यर-तिवारी सतत सक्रिय असते. अश्विनीने यापूर्वी 'नील बटे सन्नाटा', 'बरेकी की बर्फी', 'पंगा' असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. 'दंगल'चा दिग्दर्शक नितेश तिवारीची ती पत्नी आहे. याशिवाय काही काळापूर्वी तिच्या एका पुस्तकाचे प्रकाशनही झाले आहे. आता अश्विनी आगामी चित्रपटावर काम करत असून या चित्रपटाचे नाव आहे 'फाडू.' अभिनेत्री सैयामी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. याबाबत बोलताना सैयामी म्हणाली की, 'जे व्हायचे असते ते होतेच, 'फाडू' आणि माझ्याबाबत असेच झाले आहे. अश्विनीसोबत काम करणे माझ्या बकेटलिस्टमध्ये होतेच. तिच्यासोबत काम करताना मी सुरक्षित हातांखाली असल्याचे वाटत आहे."'