बॉक्स ऑफिसवर स्वत:चा खास दबदबा निर्माण केलेला सिनेमा म्हणजे सैय्यारा. थिएटरमध्ये रेकॉर्ड मोडल्यानंतर सैय्यारा आता ओटीटीसाठी सज्ज झाला आहे. या वीकएंडला सैय्यारा ओटीटीवर दिसतो आहे. इतके दिवस फॅन्स हा सिनेमा ओटीटीवर कधी दिसेल याची वाट फॅन्स पाहत आहेत.
त्यांची प्रतीक्षा संपली असून या वीकएंड तुम्ही सैय्यारा ओटीटीवर पाहू शकता. (Latest Entertainment News)
सैय्यारा 18 जुलैला थिएटरवर रिलीज झाला होता. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि विशेष म्हणजे Gen z ने या सिनेमाला चांगलेच डोक्यावर घेतले. मोहित सूरी यांनी नुकतेच सैय्यारा नेटफ्लिक्सवर दिसणार असल्याचे शेयर केले आहे.
आज म्हणजेच 12 सप्टेंबरला सैय्यारा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
रात्री 12 वाजता सैय्यारा नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
मोहित सूरी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
अहान पांडे आणि अनित पड्डा ही नवीन जोडी यातून पदार्पण करते आहे.
सैय्याराच नाही तर पुढील इतर सिनेमेही यावेळी ओटीटीवर दिसणार आहेत. या वीकएंडला तुम्ही ते देखील पाहू शकता.
रजनीकांतच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा आता ओटीटीवर दिसणार आहे. हा सिनेमा अमेझोन प्राइम व्हीडियोवर दिसणार आहे.
हॉरर कॉमेडी हा जॉनर असलेला हा सिनेमा तुम्हाला कधी हसवेल तर कधी घाबरवेल. हा तुम्हाला जिओ हॉटस्टार वर पाहता येईल.
सायकोलॉजीकल थ्रिलर पाहण्याच्या विचारात असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठीच आहे. मुलाने घरी भेटवण्यासाठी आणलेल्या गर्लफ्रेंडबाबत जेव्हा त्या मुलाच्या आईला डार्क सीक्रेट समजतात तेव्हा हा सिनेमा कसा वळण घेतो हे पाहणे रंजक आहे. हा सिनेमा प्राइम व्हीडियोवर पाहता येईल.