Saiyaara Movie fan's Videos
मुंबई - सैयारा चित्रपट प्रेक्षकांना इतका भावला आहे की, चित्रपटगृहातून अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसताहेत. अनीत पड्डा-अहान पांडे स्टारर रोमँटिक ड्रामा पाहायला सर्वाधिक तरुण वर्ग थिएटरमध्ये पाहायला मिळताहेत. सध्या सोशल मीडियावर तरुण प्रेक्षक वर्गाचे व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये विशेष, Gen Z मधील तरुण-तरुणींनी सैयारा पाहण्यासाठी उपस्थिती लावली. सैयारामधील काही सीन्स इतके खोल आहेत, हृदयसपर्शी आहेत, जे पाहून हे Gen Z स्वत:ला रडण्यापासून वाचवू शकले नाहीत. थिएटर्समध्ये नेमकं काय घडलं त्याचे भन्नाट व्हिडिओ पाहुया..
सैयारामध्ये दोन नवे चेहरे दिसताहेत-अहान पांडे आणि अनीत पड्डा. मोहित सूरीचा 'सैयारा' पाहून जेन-झेड खूपचं भावूक झाली. चित्रपट पाहिल्यानंतर थिएटरमध्ये रडत, ओरडत आणि काही जण तर बेशुद्ध अवस्थेत दिसले. एक जण तर सलाईन लावून चित्रपट पाहताना दिसला. तर काही कपल आपलं प्रेम देखील व्यक्त करताना दिसत आहेत.
विविध थिएटरमधील क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सैयारा पाहून अनेक तरुण-तरुणी स्वत:ला रडण्यापासून रोखू शकले नाहीत. थिएटरमध्येच ही मुले भावूक झाली. काही जणांना अश्रूंचा बांध फुटला..ते ढसाढसा रडताना दिसले.
अहान पांडे-अनीत पड्डा यांच्या केमिस्ट्रीवर फॅन्स खूप फिदा आहेत. काहींचा प्रेमाचा वेडेपणा कॅमेराबद्ध झालेला दिसला. काही जण हा चित्रपट पाहून त्याला वेडेपणा म्हणत आहेत. काही जण ड्रामा म्हमत आहेत. तर काहीजण म्हणत आहेत की, भावा आजारी आहेस तर देवाला आठवण कर, सैयारान चालणार नाही. आणखी एकाने म्हटलं, इतकं डेडिकेशन की रुग्णालय सोडून चित्रपट पाहायला आला.
Reddit वर या व्हिडिओवरून वाद निर्माण झाला. काय ही नवी पिढी आहे खरंच 'डूम' झाली आहे, हे तर फक्त वेडेपणा आहे, जो एखादा चित्रपटाशी प्रेम करणाराच समजू शकतो. रिपोर्टनुसार, YRF च्या माहितीनुसार, 'सैयारा' ८ हजार स्क्रीनवर रिलीज झाला आहे. या वर्षातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट आहे. तीन दिवसात ८६ कोटी रुपये चित्रपटाने कमावले आहेत. चित्रपटाचे कुठलेही प्रमोशन करण्यात आलेले नाही...कुठलेही मीडिया इंटरव्ह्यू, सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी करण्यात आलेली नाही.