Saiyaara 400 crore Hit on box office
मुंबई - सैयाराची क्रेझ बॉक्स ऑफिसवर अद्याप आहे, वर्ल्डवाईड चित्रपटाने कोटींचा गल्ला जमवला आहे. रिपोर्टनुसार, YRF आणि मोहित सुरीचा सैयारा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक धावत आहे. कारण अवघ्या १२ दिवसांत जगभरात ४०० कोटींचा बिझनेस केला आहे. अहान पांडे आणि अनित पड्डा हे ४०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारे नवोदित कलाकार ठरले. आहेत.
'सैयारा'ने १२ व्या दिवसांपर्यंत बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये धुव्वा उडवलाय. मोहित सुरी दिग्दर्शित अहान पांडे, अनित पड्डा चित्रपटाने २५० कोटींचा गल्ला पार केल्यानंतर दुसऱ्या मंगळवारी संथ सुरुवात केली. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. एक आठवडा पूर्ण आल्यानंतर चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाली असली तरी चित्रपटाने चांगली कमाई केलीय. दुसरा आठवड्याची सुरुवातही चांगली झालीय. दुसऱ्या रविवारी चित्रपटाने ३० कोटी रुपये कमावले.
सोमवार नंतर कासव गतीने कमाई होत असली तरी सोमवारी ११ व्या दिवशी ९.२५ कोटी रुपये कमावले. आणि आता १२ व्या दिवशी, दुपारपर्यंत, चित्रपटाने १.६ रुपये कमावले आहेत. रिपोर्टनुसार, आतापर्यंतचे एकूण कलेक्शन आता २५८.१७ रुपये झाला आहे.
'सैयारा'ने जगभरात ४०० कोटींचा आकडा पार केला. रिलीज होण्यापूर्वी सैयारा ४०० कोटींचा आकडा पार करेल असे कोणाला वाटले होते?... हा चित्रपट खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे, या चित्रपटाने जगभरातील त्याच्या अभूतपूर्व कामगिरीने उद्योगाला आश्चर्यचकित केले आहे.
भारत : ३१८ कोटी
परदेशात: ८६ कोटी
एकूण: जगभरात ४०४ कोटी रुपये.
'सैयारा'नंतर अनित पड्डा ओटीटी कोर्टरूम ड्रामा 'न्याय'मध्ये लैंगिक अत्याचार पीडितेच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आलीय. मोहित सुरीच्या 'सैय्यारा' मध्ये कास्ट होण्यापूर्वीच तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. 'न्याय' मध्ये, अनीत एका १७ वर्षीय लैंगिक अत्याचार पीडितेची भूमिका साकारणार आहे. ती एका शक्तिशाली व्यक्तीविरुद्ध कायदेशीर लढाई लढते. या मालिकेत फातिमा सना शेख पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल. तसेच अर्जुन माथूरचीही महत्त्वाची भूमिका आहे. या शोचे सह-दिग्दर्शन नित्या मेहरा आणि तिचा पती करण कपाडिया यांनी केले आहे.