Saif Ali Khan वर हल्ल्यानंतर ज्यु. एनटीआर, पूजा भट 'हे' कलाकार काय म्हणाले?  Instagram
मनोरंजन

Saif Ali Khan वर हल्ल्यानंतर ज्यु. एनटीआर, पूजा भट 'हे' कलाकार काय म्हणाले?

Saif Ali Khan वर हल्ल्यानंतर ज्यु. एनटीआर, पूजा भटची प्रतिक्रिया समोर?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या पहाटे २.३० च्या सुमारास त्याच्या मुंबई वांद्रेतील घरात हल्ला झाला. त्याच्यावर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ज्यु. एनटीआर - सैफ सरांवरील हल्ल्याबद्दल ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना.

नील नितिन मुकेश - सैफ सर आणि संपूर्ण कुटुंबासह माझ्या प्रार्थना. हे खरंच खूप दुःखद आहे !! तुमचे शौर्य आणि तुमच्या कुटुंबाप्रती प्रेमाला उपचार, शक्ती आणि शांती मिळो. लवकर बरे व्हा #SaifAliKhan.

चिरंजीवी कोनिडेला - सैफ अली खानवर घुसखोराने केलेल्या हल्ल्याच्या बातमीने खूप व्यथित झालो. त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT