पुढारी ऑनलाईन डेस्क - सैफ अली खान याच्यावर ज्याने हल्ला केला त्या हल्लेखोराने १४ जानेवारी रोजी अभिनेता शाहरुख खानच्या बंगल्याची शिडी लावून रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. शाहरुख खानचा बंगला मन्नतजवळ रिट्रीट हाऊसच्या मागे ६ ते ८ फूट लांब लोखंडी शिडी लावून घराच्या आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला जात होता. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना संशय आहे की, शाहरुख खानच्या घरी रेकी करणारा व्यक्ती तीच आहे, ज्याने सैफ अली खानवर हल्ला केला होता.
पोलिसांच्या हाती शाहरुख खानच्या घराच्या जवळ असणारे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली आहे. या फुटेजमध्ये दिसणारा व्यक्तीची उंची आणि बॉडी स्ट्रक्चर त्या सीसीटीव्हीवाल्या व्यक्तीशी मिळतेजुळते आहे. पोलिसांना सैफ अली खानच्या इमारतीच्या शिडींवरून जात असलेल्या व्यक्तीच्या फुटेजशी ते मिळतेजुळते आहे.
इतकचं नाही तर सूत्रांनुसार, पोलिसांना संशय आहे की, तो व्यक्ती एकटा असू शकत नाही. कारण ज्या लोखंडी शिढीचा वापर रेकी करण्यासाठी करण्यात आली होती, ती शिढी एकटा व्यक्ती उचलणे कठीण आहे. ती शिडी उचलण्यासाठी किमान दोन ते तीन लोकांची गरज लागेल.
१५ जानेवारीच्या रात्री सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर पोलिसांची एक टीम पुन्हा शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर पोहोचली होती. शाहरुख खानकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पण, पोलिस हे प्रकरण गंभीर्याने घेत तपास करत आहे.