सईने 'हंटर' या सिनेमातील काही सीन्सवर प्रतिक्रिया दिल्या आहेत instagram
मनोरंजन

Sai Tamhankar |'हंटर' सिनेमा काळाच्या पुढचा होता

'हंटर' सिनेमा काळाच्या पुढचा होता

पुढारी वृत्तसेवा

सई ताम्हणकर ही मराठी कलाजगतातील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने हिंदी सिनेसृष्टीतही जम बसविला आहे. सईने आतापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. मग, ती 'दुनियादारी' मधली स्टायलिश सई असो अथवा 'हंटर' सिनेमातील बोल्ड सई. 'हंटर' या सिनेमामुळे सई प्रचंड चर्चेत आली होती. यामध्ये तिने बोल्ड सीन्स दिले होते.

आता अनेक वर्षांनी सईने 'हंटर' या सिनेमातील सीन्सवर कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींचा काय काय प्रतिक्रिया होती, यावर भाष्य केले आहे. 'हंटर' हा सिनेमा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता ९ वर्षांनी सईने या सिनेमावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत सई म्हणाली की, 'हंटर' असा सिनेमा होता जो काळाच्या खूप पुढे होता. त्यानंतर हा कल्ट सिनेमा म्हणून लोकप्रिय झाला. अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती. मी हिमाचल प्रदेशला गेले होते. तिथे दोन पंजाबी मुले मला भेटली. त्यांनी मला विचारले की, मी हीच 'हंटर' या सिनेमातील अभिनेत्री आहे काय? ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. मी सिनेमात जे केले ते माझ्या मित्रांना आणि कुटुंबाला पचवणं काही प्रमाणात कठीण होते; पण त्यानंतर काही वर्षांनी आता त्यांना त्या सीन्सबाबत फार काहीच वाटत नाही. कारण, जसे मी म्हटले की, तो सिनेमा त्या काळाच्या खूप पुढचा होता. आता अनेक वर्षांनी सईने दिलेल्या खुलाशाची चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT