पुढारी ऑनलाईन डेस्क - सध्या सोशल मीडियावर जिची चर्चा आहेत अशी एकमेव मल्टीटास्किंग क्वीन म्हणजे सई ताम्हणकर ! अभिनय आणि तिचं समीकरण कमालीचं आहे हे तिच्या प्रत्येक प्रोजेक्ट्समधून अनुभवायला मिळतंय. उत्तम काम आणि तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका कायम लक्षवेधी ठरत असताना सई आता ग्राउंड झीरो चित्रपटात झळकणार आहे.
इम्रान हाश्मी सोबत सई ग्राउंड झीरोमध्ये दिसणार असून ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित आणि मराठमोळ्या तेजस देऊस्करने दिग्दर्शित केलेल्या 'ग्राउंड झीरो' या चित्रपटाचे श्रीनगरमध्ये रेड कार्पेट स्क्रीनिंग झालं. अशाप्रकारे रेड कार्पेट स्क्रीनिंग होणारा गेल्या ३८ वर्षातील हा पहिला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सई सोबतीने इम्रान आणि निर्माता फरहान अख्तर आणि चित्रपटातील इतर मंडळी श्रीनगरमध्ये गेली होती. सई ग्राउंड झीरो सिनेमात बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या पत्नीची भूमिका साकारणार असून आता सईला ग्राउंड झीरो मध्ये बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
श्रीनगरमध्ये झालेल्या 'ग्राउंड झीरो' च्या ऐतिहासिक स्क्रीनिंगसाठी सईने खास लाल रंगाच्या सलवार सूटला पसंती दिली असून तिने सोशल मीडियावर तिच्या रेड कार्पेट लूकचे काही फोटोही शेअर केले आहेत.