मनोरंजन

Sachin Pilgaonkar | सचिन पिळगावकर महिला दिनाला आणणार ‘स्थळ’ चित्रपट

Sachin Pilgaonkar | सचिन पिळगावकर महिला दिनाला आणणार ‘स्थळ’ चित्रपट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेते सचिन पिळगावकर आता नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. धुन प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित "स्थळ" या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगावकर करणार आहे. महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्चला "स्थळ" हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त "स्थळ" चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी "स्थळ" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर यांनी शॉर्ट फिल्म्ससह ‘गिल्टी माईंड्स’ या गाजलेल्या वेब सीरिजचं सहदिग्दर्शन केलं होतं. "स्थळ" हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

श्रियाने मामी फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट पाहिले होता. खास श्रियाच्या आग्रहास्तव अमेरिकेत "नाफा" फिल्म फेस्टिव्हलमध्ये मी आणि सुप्रियाने "स्थळ" हा चित्रपट पाहिला. त्यावेळीच हा चित्रपट आम्हा दोघांनाही प्रचंड आवडला होता. महाराष्ट्रातील मातीत रूजलेल्या या चित्रपटाला अमेरिकेच्या मराठी लोकांनी डोक्यावर घेतलेले पाहून, चित्रपट प्रदर्शित करताना काही मदत लागल्यास आवर्जून सांगा असे निर्माता, दिग्दर्शक जयंत सोमलकर यांना आम्ही सांगितले. "स्थळ" चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी मला चित्रपटाची प्रस्तुती करण्यास विचारले आणि मी लगेच होकर दिला. चांगली संहिता ही रसिक प्रेक्षकांपर्यंत अवश्य पोहचली पाहिजे यासाठी मी या चित्रपटाची प्रस्तुती करण्याचे ठरविले असे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगावकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT