सारं काही तिच्यासाठी  
मनोरंजन

सारं काही तिच्यासाठी : स्वप्ननगरीत फुलणार निशी-नीरज, ओवीचे-श्रीनूचं नातं!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे "सारं काही तिच्यासाठी". झी मराठी वरील ह्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक भावनिक स्थान निर्माण केले असून या मालिकेतले सगळी नाती प्रेक्षकांच्या पसंतीत पडताना दिसत आहेत. येणाऱ्या काही भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मुंबईच्या हवेत एक वेगळीच जादू आहे. मुंबईला असंच मायानगरी आणि स्वप्ननगरी नाही म्हणत. उमा, रघुनाथरावांकडे निशी, ओवी आणि श्रीनूला मुंबईला जायची परवानगी मागते. त्याप्रमाणे दादा खोत निशी आणि श्रीनूला स्टडीटूर साठी मुंबईला जाण्याची परवानगी देतात, हा विचार करून की ते दोघे मुंबईला गणपती मंदिरात जाऊन एकत्र गणरायाचा अभिषेक करतील.

संबंधित बातम्या –

दादांकडून होकार मिळाल्यावर निशी, ओवी, श्रीनू उत्साहित होऊन कॅम्पसाठी जायला निघतात. मुंबईत नीरज, निशी, श्रीनू आणि ओवी मुंबईतल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. चौघेही एकत्र उत्तम वेळ घालवतात, हा वेळ घालवत असताना, नीरज एकांतात निशिजवळ आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करतो. नीरजच हे रूप पाहून निशी आश्चर्यचकित होते. तर दुसरीकडे ओवी ही श्रीनूच्या अत्यंत प्रेमात आहे. पण हे सगळं होत असताना रघुनाथरावांनी आणि उमाई ने निशी आणि श्रीनू यांना मुंबईत गणपतीच्या मंदिरात जाऊन जो अभिषेक करायला सांगितलाय. तो अभिषेक अनावधानाने ओवी आणि श्रीनुच्या हातून होतो. आता काय होणार जेव्हा उमा आणि रघुनाथपर्यंत ही बातमी पोहचणार? स्वप्ननगरी मध्ये निशी आणि ओवीचे स्वप्न सत्यात अवतरले का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT