Rutuja Junnarkar on Shraddha Kapoor Pudhari photo
मनोरंजन

Rutuja Junnarkar| श्रद्धा कपूरने मराठमोळ्या अभिनेत्रीला केलं इन्स्टाग्रामवर फॉलो; सोशल मीडियावर रंगली चर्चा

Rutuja Junnarkar | सोशल मीडियावरचे छोटे नोटिफिकेशन देखील कधी कधी मोठे आनंद देतात, श्रद्धा कपूरने या अभिनेत्रीला इन्स्टा फॉलो करताच पोस्ट व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

मराठी अभिनेत्री रुतुजा जुन्नरकर हिला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने इन्स्टाग्रामवर फॉलो केल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. या छोट्याशा नोटिफिकेशनने मोठा आनंद मिळाल्याची भावना व्यक्त करत रुतुजाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. तिची ही पोस्ट चाहत्यांमध्ये चांगलीच व्हायरल होत असून अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या दमदार अभिनयासोबतच सातत्याने नव्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असते. लवकरच ती 'ईठा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच श्रद्धाने एका मराठमोळ्या अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर फॉलो केल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

अभिनेत्री आणि नृत्यांगना ऋतुजा जुन्नरकर हिला श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर फॉलो केल्याचे समोर आले आहे. श्रद्धाने अचानक ऋतुजाला फॉलो का केले, यामागे एखादा आगामी प्रोजेक्ट आहे का, की यामागे दुसरे काही कारण आहे, याबाबत चाहत्यांमध्ये विविध तर्क-वितर्क रंगू लागले आहेत.

या आनंदाच्या क्षणाबद्दल ऋतुजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "हे सगळं माझ्यासाठी खूप स्वप्नवत आहे. श्रद्धा कपूरसारखी बहुगुणी अभिनेत्री मला फॉलो करतेय, यावर अजूनही विश्वास बसत नाही. सोशल मीडियावरील एखादं छोटंसं नोटिफिकेशनही आयुष्यात मोठा आनंद देऊन जातं. ही भावना खूप खास असून ती शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे."

ऋतुजा जुन्नरकरने यापूर्वी विविध मालिका, रिअॅलिटी शो आणि नृत्याविषयक कार्यक्रमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या अभिनयासह नृत्यकौशल्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. दरम्यान, आगामी काळात ती आणखी काही नव्या प्रोजेक्ट्समधून झळकणार असल्याचीही चर्चा आहे.

श्रद्धा कपूरच्या या एका सोशल मीडिया कृतीमुळे ऋतुजा जुन्नरकर पुन्हा एकदा चर्चेत आली असून, या दोघी नव्याने एखाद्या प्रोजेक्टसाठी एकत्र काम करणार आहेत का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT