roopnagar ke cheitey 
मनोरंजन

roopnagar ke cheitey : ‘लालबागच्या राजा’च्या दरबारी ‘रूप नगर के चीते’

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : लालबागच्या राजाच्या चरणी आगामी 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी नुकतीच हजेरी लावली. (roopnagar ke cheitey) यावेळी चित्रपटाच्या यशासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेतला. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत आणि 'लालबागचा राजा'च्या जयघोषात आपल्या चित्रपटाचे नवीन पोस्टर ही याप्रसंगी बाप्पाच्या चरणी अर्पण केले. १६ सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या धामधुमीत लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाची संधी कलाकारांनी सोडली नाही. (roopnagar ke cheitey)

याप्रसंगी चित्रपटातील कलाकार करण परब, कुणाल शुक्ल, आयुषी भावे, हेमल इंगळे, सना प्रभू, निर्माते मनन शाह आणि दिग्दर्शक विहान सूर्यवंशी लालबागच्या राजाच्या दरबारी हजर होते. या चित्रपटाची निर्मीती एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांचे आहे.

मनाच्या आतमध्ये स्वत:शी युद्ध सुरू असताना आपण करतोय ते चूक की बरोबर? याची शहानिशा करण्यासाठी आपल्या आत डोकावणारा जवळचा मित्र गरजेचा असतो. त्याचंही म्हणणं ऐकणं महत्त्वाचं असतं, याच मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट 'रूप नगर के चीते' चित्रपटात पहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT