rockstar dsp and ram charan  
मनोरंजन

Rock Star DSP : राम चरण-दिग्दर्शक सुकुमार यांच्या चित्रपटासाठी रॉकस्टार डीएसपीचे म्युझिक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ चित्रपट राम चरण पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार यांच्यासोबत पुढील प्रोजेक्ट करणार आहे. रॉकस्टार डीएसपी या खास प्रोजेक्टसाठी म्युझिक देणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेता राम चरण हे (Rock Star DSP ) त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी तयारी करत असताना देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी या चित्रपटाचे संगीत करणार आहेत. हा प्रोजेक्ट खास आहे. कारण या तिघांनी यापूर्वी 'रंगस्थलम' या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.  (Rock Star DSP )

रॉकस्टार डीएसपीनेही ट्विटरवर जाऊन या प्रोजेक्टबद्दल खास बातमी दिली. चाहत्यांना या आगामी चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे यात शंका नाही. या वर्षाच्या उत्तरार्धात निर्मिती सुरू होणार असल्याचं समजतंय. अद्याप चित्रपटाचे शीर्षक न ठरलेल्या चित्रपटाचे २०२५ च्या शेवटच्या तिमाहीत भव्य प्रदर्शन होणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers द्वारे केली जात आहे आणि त्याचे लेखन सुकुमार यांनी केले आहे.

डीएसपी अनेक प्रोजेक्ट करणार असून २०२४ च्या रिलीजमध्ये पवन कल्याण-स्टार 'उस्ताद भगत सिंग', अजित कुमारचा 'गुड बॅड अग्ली', सुर्या-स्टार 'कंगुवा', धनुष-स्टार 'कुबेरा', विशाल-स्टार 'रथनम', अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' यांचा समावेश असून नागा चैतन्य-स्टार 'थंडेल' हा सुद्धा प्रोजेक्ट करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT