पुढारी ऑनलाईन डेस्क - मराठमोळी रिधीमा पंडित नीरज पांडेच्या सिकंदर का मुकद्दरमधील अनोखी ओळख निर्माण करून आता बॉलिवूडमध्ये आपली इनिंग खेळणार आहे. नीरज पांडे दिग्दर्शित नेटफ्लिक्सचा नवीन ब्लॉकबस्टर सिकंदर का मुकद्दर, ह्या चित्रपटाच्या कथानकाने आणि दमदार कलाकारांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अविनाश तिवारी, जिमी शेरगिल, तमन्ना भाटिया आणि दिव्या दत्ता यांचा समावेश आहे. या माध्यमातून रिधीमा पंडित ओटीटी पदार्पण करते.
रिधीमा बॉलीवूडमधील एन्ट्री म्हणाली, “ही भूमिका एक आव्हानात्मक आणि महत्त्वाची होती. मी प्रत्येक क्षणात मनापासून झोकून दिलं होत, आणि लोकांकडून त्याचे कौतुक पाहणे म्हणजे माझ्यासाठी जग आहे. अशा अतुलनीय अभिनेत्यांसोबत काम करणे हा एक मास्टरक्लास होता आणि माझा प्रवास सुरू करण्याच्या या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे.”
हिंदी टीव्ही मालिका बहू हमारी रजनीकांतने घराघरात नाव कोरलेली रिधीमा पंडित आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे . दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या आगामी ‘महेशता बदला’ या मराठी चित्रपटात अंकुश चौधरीसोबत ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात ती गावात राहाणाऱ्या एका साध्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. रिधिमाने हा चित्रपट तिच्या आजीला समर्पित केला आहे.
रिधीमाने मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि करण ग्रोवर अभिनीत बहू हमारी रजनीकांत या मालिकेतून तिने अभिनयात पदार्पण केले. कृष्णा अभिषेक, अली असगर, सुगंधा मिश्रा, सुदेश लेहरी आणि संकेत भोसले या ख्यातनाम विनोदी कलाकारांसोबत तिने द ड्रामा कंपनीमध्ये तिची विनोदाचा ठसका दाखवला तर तिने डान्स चॅम्पियन्सचे आयोजन देखील केले आणि फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी ९ मधील द्वितीय उपविजेती म्हणून ओळख मिळवली. हैवान: द मॉन्स्टर या साय-फाय ड्रामा मध्ये तिने परम सिंग आणि अंकित मोहन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत अमृताची भूमिका साकारली आहे.