पुढारी ऑनलाईन डेस्क - अली फजल आणि ऋचा चड्ढा पालक झाल्यानंतर आता बाळाच्या नावाचा खुलासा केला आहे. ५ महिने झाल्यानंतर या बॉलिवूड कपलने आफल्या बाळाचे नाव सर्वांसमोर आणले आहे. ऋचा चड्ढाने जुलै महिन्यात बाळाला जन्म दिला होता. ऋचा आणि अलीने एका जॉईंट स्टेटमेंटच्या माध्यमातून गुड न्यूज दिली होती. एका मुलाखतीत ऋचा चड्ढाने आपल्या मुलीचे नाम सांगितले. तिने बाळाचे नाव जुनैयरा इदा फजल असे ठेवले आहे.
जुनैयरा या नावाचा अर्थ जन्नत (स्वर्ग) चे एक फुल असे होते. मुलाखतीत ऋचाने सांगितले की, ती लेकीला जूनी म्हणून बोलावते. अली फजल म्हणाला की, बाळ झ्लायनंतर घरातून बाहेर जाताना चिंता सतावते. त्याला नेहमी ऋचा आणि लेकीजवळ राहावेसे वाटते. अद्याप या कपलने बाळाचा चेहरा दाखवलेला नाही.