Evergreen Rekha Umrao Jaan Re-Release
मुंबई - चित्रपटसृष्टीचा खजिना असलेला उमराव जान थिएटरमध्ये परतण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे निर्माते एस. के. जैन अँड सन्स आणि इंटिग्रेटेड फिल्म्स आहेत. दूरदर्शी मुझफ्फर अली दिग्दर्शित आणि एव्हरग्रीन रेखाचा हा चित्रपट २७ जूनपासून मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहता येणार आहे.
१९८१ मध्ये रिलीज झालेला उमराव जान पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. चित्रपटातील रेखाच्या कमलीच्या सौंदर्याने प्रत्येक जण घायाळ झाला होता. आता हेच सैंदर्य पुन्हा भारावून टाकणार आहे. चित्रपटप्रेमींना आता १९ व्या शतकातील लखनौची भव्यता पुन्हा अनुभवता येणार आहे. इतकेच नाही तर चित्रपट ४K मध्ये सुंदरपणे साकारण्यात आला आहे. चित्रपटाचे पुनर्संचयित करण्याचे काम चित्रपट संस्था नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (NFAI) आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) यांनी केले आहे.
रिपोर्टनुसार, रेखा यांचा 'उमराव जान' हा चित्रपट २७ जून रोजी मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ज्येष्ठ चित्रपट निर्माते मुझफ्फर अली एक आवृत्ती कॉफी टेबल बुकदेखील लाँच करत आहेत. त्यामध्ये जे उमराव जानच्या निर्मितीचा पडद्यामागील स्टोरी असेल. या पुस्तकात कधीही न पाहिलेले छायाचित्रे, पोशाख रेखाचित्रे, सुलेखन, कविता आणि सेटवरील वैयक्तिक किस्से समाविष्ट आहेत.
या क्लासिक चित्रपटात रेखाने साकारलेली गणिका-कवयित्रीची भूमिका चित्रपट इतिहासातील सर्वोत्तम अभिनयापैकी एक मानली जाते. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. चित्रपटातील गझल - दिल चीज क्या है, इन आंखों की मस्ती आणि जुस्तजू जिसकी थी आजदेखील लोकप्रिय आहेत.