Ravi Mohan-keneeshaa francis visit Tirupati temple
मुंबई - साऊथ स्टार रवी मोहन आपल्या तथाकथित गर्लफ्रेंड केनिशा फ्रान्सिससोबत तिरुपती दर्शनाला गेला होता. तेथील त्यांचे व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल होत आहेत. २५ ऑगस्ट रोजी ते तिरुपती बालाजी मंदिर गेल होते. दरम्यान, रवी मोहन यांची पहिली पत्नी आरती रवी भडकली. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज लिहिला, ज्याची चर्चा होऊ लागलीय.
रवी मोहन आणि आरती रवी वेगळे झाले आहेत. त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण सध्या कोर्टात सुरु आहे. दोघे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, त्याची तथाकथित गर्लफ्रेंड केनिशा फ्रांसिस सोबत २५ ऑगस्ट तिरुपति बालाजी मंदिर गेले होते, त्यानंतर आरतीने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केले आहे.
आरतीने पोस्टमध्ये लिहिलं- "तू परमेश्वराला धोका देऊ शकत नाहीस. तुम्ही दुसऱ्यांना मूर्ख बनवू शकता. स्वत:ला देखील मूर्ख बनवू शकता. पण तुम्ही परमेश्वराला धोका देऊ शकत नाही." इतकेच नाही तर यानंतर आरतीने मुलांच्या शांतीची सुरक्षा करण्याविषयी देखील एक पोस्ट केली होती.
रवी मोहन आणि आरती रवीने २००९ मध्ये लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत- आरव आणि अयान. वेगळे झाल्यानंतर दोन्ही मुले आपल्या आईसोबत राहतात. लग्नात दुरावा आल्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी वेगळे होण्याची घोषणा केली होती. आता रवी यांचे नाव केनिशा फ्रान्सिस यांच्या सोबत जोडलं जात आहे. दोघे नेहमी एकत्र वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसतात.