Raveena Tandon Viral Video  
मनोरंजन

Viral Video : रवीना टंडनने वांद्रेतील ट्रॅफिक वॉर्डनची अचानक भेट का घेतली? मिठी मारली अन्...

Raveena Tandon : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने मुंबईतील वांद्रे येथील एका महिला ट्रॅफिक वॉर्डनची भेट घेतली आहे.

मोहन कारंडे

Raveena Tandon Viral Video

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने मुंबईतील वांद्रे येथील एका महिला ट्रॅफिक वॉर्डनची भेट घेतली आहे. हा क्षण चाहत्यांना खूप भावला असून यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घ्या, नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये?

काय आहे व्हायरल व्हिडिओ?

व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री रवीना निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती अनीत लोबो नावाच्या एका ट्रॅफिक वॉर्डनला भेटत आहे, ज्या मुंबईतील वांद्रे येथे गेल्या जवळपास २० वर्षांपासून वाहतूक नियंत्रणाचे (ट्रॅफिक कंट्रोल) काम करत आहेत. अनेक अडचणींनंतरही त्या आपल्या कर्तव्यावर ठाम आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये रवीनाने ट्रॅफिक वॉर्डनला मिठी मारून तिचे कौतुक केले.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले की, "ते या ट्रॅफिक वॉर्डनला लहानपणापासून रस्त्यावर पाहत आहेत." दुसऱ्या युझरने म्हटले की, "अभिनेत्री मनाने खूप चांगली आहे." तर एका अन्य युझरने लिहिले की, "दोघीही खूप छान दिसत आहेत." याशिवाय इतर युझर्सनी अनिता लोबो यांचे कौतुक केले आहे.

रवीना टंडन लवकरच 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात दिसणार आहे. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट असून, याचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत. या चित्रपटात रवीना टंडनशिवाय अक्षय कुमार, सुनील शेट्टी, संजय दत्त, दिशा पटानी, लारा दत्ता यांच्यासह इतरही अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाला मीट ब्रदर्स यांनी संगीत दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT