Rashmika - Vijay wedding 
मनोरंजन

Rashmika - Vijay wedding |रश्मिका - विजयने नाकारली Netflix ची 60 कोटींची ऑफर: लग्न आमच्या आयुष्यातील अत्यंत पवित्र क्षण!

नेटफ्लिक्सने दिली होती लग्नाच्या लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी 60 कोटींची ऑफर

Namdev Gharal

Rashmika - Vijay wedding सध्या नॅशनल क्रश रश्मिका मंदाना व रावडी स्टार विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चेची सोशल मिडीयावर धूम सुरु आहे. ही जोडी 26 फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. हे लग्न अनेक चाहत्‍यांसाठी पर्वणी असणार आहे यासाठीच आघाडीची ओटीटी कंपनी नेटफ्लिक्सने या लग्नाच्या लाईव्ह स्ट्रिंमिग करण्यासाठी या जोडीला 60 कोटींची ऑफर दिली होती. पण या दोघांनी ही ऑफर नम्रपणे नाकारल्याचे समोर आले आहे. विवाह सोहळा हा आमच्यासाठी पवीत्र आहे तो आम्हाला खासगी ठेवायचा आहे असे त्‍यांनी म्हटले असल्याचे समजते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक वर्षांपासून रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा सुरू असतात. त्‍यांचे लग्न कधी होणार याची उत्‍सुकता प्रेक्षकांना होती आता त्यांच्या लग्नाच्या तारखाही जवळ येत असल्याचे बोलले जात आहे. अशातच, नेटफ्लिक्स त्यांच्या लग्नाच्या एक्सक्लुझिव्ह स्ट्रीमिंग हक्कांसाठी (Streaming Rights) ६० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र, या जोडीने ही कोट्यवधींची ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे.

आम्हाला या क्षणांचे व्यवसायत रुपांतर करायचे नाही

विजय आणि रश्मिकाच्या मते, लग्न हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी आणि पवित्र क्षण आहे. त्यांना या क्षणाचे व्यवसायात रूपांतर करायचे नाही. यापूर्वी नयनतारा आणि विग्नेश शिवन यांच्या लग्नाच्या स्ट्रीमिंग हक्कांवरून झालेल्या कायदेशीर वादांमुळे ही जोडी सावध असल्याचे समजते. आणि जर त्यांना आपल्या लग्नाचे काही क्षण चाहत्यांसोबत शेअर करायचे असतीलच, तर ते त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून मोफत शेअर करतील, अशी चर्चा आहे.

काही सूत्रांच्या माहितीनुसार, हे जोडपे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमधील एका हेरिटेज पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे.त्‍यानंतर ४ मार्च २०२६ रोजी हैदराबादमधील हॉटेल ताज कृष्णा येथे एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या जोडीचा साखरपुडा ३ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयच्या हैदराबादमधील घरी अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडल्याची माहिती आहे.

अद्याप अधिकृत घोषणा नाही

या दोघांच्या लग्नाची घाई त्‍यांच्या चाहत्‍यांनाच फार झाल्याचे दिसत आहे. कारण सोशल मीडियावर लग्नाची पत्रिका आणि तारखा व्हायरल होत आहेत. पण रश्मिका किंवा विजय यांनी अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT