Rashmika Mandanna The Girlfriend release date  Instagram
मनोरंजन

Rashmika Mandanna The Girlfriend | काऊंटडाऊन सुरु थामा नंतर रश्मिका बनणार 'गर्लफ्रेंड'

Rashmika Mandanna The Girlfriend | काऊंटडाऊन सुरु थामा नंतर रश्मिका बनणार 'गर्लफ्रेंड'

स्वालिया न. शिकलगार

रश्मिका मंदान्ना हिच्या ‘द गर्लफ्रेंड’ चित्रपटाचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. नवीन पोस्टर रिलीज होताच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, हा चित्रपट तिच्या करिअरमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Rashmka Mandanna The Girlfriend release date

मुंबई - दक्षिणेची सुपरस्टार आणि बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा आगामी चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’ (The Girlfriend) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे.

कधी रिलीज होणार द गर्लफ्रेंड?

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राहुल रविंद्रन यांनी केलं आहे. हेशाम अब्दुल वहाब यांचे संगीत आहे आणि सिनेमॅटोग्राफी कृष्णन वसंत यांचे आहे. 'द गर्लफ्रेंड'मध्ये रश्मिका मंदाना शिवाय धीक्षित शेट्टी, राव रमेश आणि रोहिणी ययासारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी रिलीज होईल.

'द गर्लफ्रेंड' चित्रपट उद्योगातील एक वेगळा मनोरंजनात्मक असूच शकत नाही. रश्मिका सध्या 'थामा' या बहु-स्टारर चित्रपटाच्या यशासाठी आणखी लोकप्रिय ठरलीय. थामाने बॉक्स ऑफिसवर सिद्ध केलं की, चित्रपटाची एकमेव मुख्य अभिनेत्री नसतानाही, तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे चित्रपटाला १०० कोटींचा टप्पा सहजतेने पार करता आला.

गेल्या काही वर्षांपासून, रश्मिकाने 'किरीक पार्टी', 'गीता गोविंदम', 'पुष्पा', 'अ‍ॅनिमल' यासारखे ब्लॉकबस्टर हिट दिले आहेत. आता त्यात थामाचीही भर पडलीय. आता द गर्लफ्रेंड हा चित्रपट तिच्या स्टार प्रतिमेच्या पलीकडे जाऊऩ बाजू दाखवणार आहे. तिच्या साखरपुड्याच्या चर्चेच्या दरम्यान प्रदर्शित होणारा हा चित्रपट सुपरहिट ठेरल, असे फॅन्सना वाटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT