आयुष्मान खुरानाचा ‘थामा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून, त्याने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आयुष्मान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटाने केवळ कमाईच नाही, तर सामाजिक संदेशही दिला आहे.
100 crores box office collection movie Thamma
मुंबई – बॉलिवूडचा बहुप्रतिभावान अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चमकला आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘थामा’ हा चित्रपट आता अधिकृतपणे १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला असून, आयुष्मानच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘थामा’ने दमदार ओपनिंग घेतली होती. विकेंडला तर चित्रपटाने जोरदार कमाई केली आणि केवळ दुसऱ्या आठवड्यातच त्याने १०० कोटींचा टप्पा पार केला. ट्रेड अनालिस्ट्सनुसार, चित्रपटाने देशांतर्गत बाजारात तब्बल १०२.३ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर वर्ल्डवाइड कलेक्शन १३५ कोटींच्या जवळ पोहोचले आहे.
बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाचा पहिला मोठा चित्रपट ‘थामा’ हा पाचवा चित्रपट आहे, जो अधिकृतपणे १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे! या यशासह, आयुष्मानने आपल्या हटके आणि अनोख्या अभिनयाने पाच १०० कोटींचे हिट चित्रपट दिले आहेत.
‘थामा’ ने भारतात बॉक्स ऑफिसवर १०३.५० कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. याआधी त्यांच्या इतर १०० कोटींच्या हिट्स म्हणजे ‘ड्रीम गर्ल’ (१४२.२६कोटी), ‘ड्रीम गर्ल २’ (₹१०४.९० कोटी), ‘बधाई हो’ (१३७.६१ कोटी) आणि ‘बाला’ (११६.८१ कोटी) आहेत.
त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत ‘ड्रीम गर्ल’, ‘बधाई हो’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘थामा’ आणि ‘अंधाधुन’ सारख्या चित्रपट दिले आहेत, आता त्याच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
आयुष्मान खुराना म्हणाला, “थामा हा माझ्या करिअरमधील एक वेगळा आणि भावनिक प्रवास आहे. लोकांनी हा चित्रपट मनापासून स्वीकारला, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे. माझ्या सिनेमा शैलीसोबत असं यश मिळणं माझ्यासाठी खास आहे, कारण मला नेहमीच नवं, वेगळं आणि प्रामाणिक कंटेंट आवडतं. प्रेक्षकांना असं सिनेमा आवडताना, ते इतरांपर्यंत पोहोचवताना पाहणं हे एका कलाकारासाठी अत्यंत आनंददायी आहे. माझ्या इतक्या चित्रपटांनी फ्रँचायझ बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे.”आयुष्मान खुराना, अभिनेता
स्त्री, स्त्री २, मुंज्या आणि भेडिया यांसारख्या हॉररपटानंतर आदित्य सरपोतदार दिग्दर्शित थामा चित्रपट आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांच्या भूमिका आहेत.
थामाची कमाई किती?
पहिला दिवस: २४ कोटी रुपये
दुसरा दिवस: १८.६ कोटी रुपये
तिसरा दिवस: १३ कोटी रुपये
चौथा दिवस: १० कोटी रुपये
पाचवा दिवस: १३.१ कोटी रुपये
सहावा दिवस: १२.६ कोटी रुपये
सातवा दिवस: ४.३ कोटी रुपये
आठवा दिवस: ५.५ कोटी रुपये