मनोरंजन

Rashmika Mandanna : रश्मिका घेते ‘इतके’ मानधन

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : 
'पुष्पा : द राईज'मधून देश-विदेशात लोकप्रिय ठरलेली रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य अभिनेत्री आता हिंदी चित्रपटातही चांगली बिझी झाली आहे. रश्मिका एका चित्रपटासाठी किती मानधन घेते याबाबतही अनेकांना उत्सुकता असते. एका माहितीनुसार रश्मिका एका चित्रपटासाठी दोन ते अडीच कोटी रुपये मानधन घेते. अर्थात हे मानधन अन्य दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या तुलनेत कमीच आहे.

दक्षिणेत सर्वाधिक मानधन घेते अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू. सामंथा तिच्या एका चित्रपटासाठी आठ कोटी रुपयांपर्यंत मानधन घेते. दुसर्‍या क्रमांकावर आहे नयनतारा. ती एका चित्रपटासाठी पाच ते सात कोटी रुपये मानधन घेते. 'बाहुबली'मुळे हिंदी पट्ट्यातही प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही याबाबत तिसर्‍या क्रमांकावर आहे. ती एका चित्रपटासाठी सहा कोटी रुपये मानधन घेते.

चौथ्या क्रमांकावर पूजा हेगडे असून ती अडीच ते सहा कोटी रुपये मानधन घेते. अर्थातच आता रश्मिका हिंदीत तसेच दक्षिणेतही चांगलीच बिझी झाल्याने भविष्यात तिच्या मानधनाचा आकडाही वाढलेला दिसला तर नवल नको!

कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये चित्र-शिल्पातून दिला जातोय शाहू विचारांना उजाळा | शाहू कृतज्ञता पर्व

SCROLL FOR NEXT