पुढारी ऑनलाईन डेस्क - रश्मिका मंदानाने नुकताच आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. तिचे आता बीचवरील फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आणखी एका अभिनेत्याचे बीचवरील फोटो समोर आले आहेत. खास म्हणजे दोघांच्या फोटोंमध्ये त्यांच्यामागे सेम बॅकग्राऊंड पाहायला मिळत आहे. त्यावरून त्यांच्या फॅन्सनी अंदाज बांधला की, दोघेही एकाच ठिकाणी वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गेले असावेत.
दरम्यान, रश्मिका मंदानाने ५ एप्रिलला ओमानमध्ये आपला २९ वा बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं. त्यावेळी तिने आपले खूप सुंदर फोटोज शेअर केले. दुसरीकडे सेम लोकेशन असलेले फोटोज विजय देवरकोंडाने देखील पोस्ट केले.
काही दिवसांपूर्वी विजय - रश्मिका मुंबईमध्ये लंच डेटवर गेले होते. ३० मार्च रोजी रूमर्ड कपल एका रेस्टॉरेंटच्या बाहेर स्पॉट झाले होते. त्याच दिवशी तिचा चित्रपट ‘सिकंदर’ रिलीज झाला होता. आता तिच्याकडे 'थामा' आणि 'पुष्पा ३' सारखे चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत.
फॅनने म्हटलं की, 'खुर्चीचे डिझाईन पाहिलं का? ते रश्मिकाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये आहे.' दुसऱ्या फॅनने लिहिलं - 'रश्मिका बर्थडे सेलिब्रेशन. बेस्ट कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरेकोंडा. परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव राहो.'