पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘नाम’ या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच अजय देवगणनेही आगामी ‘आजाद’ चित्रपटाची घोषणा केली आहे. कारण त्याचा पुतण्या अमन देवगण या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. याशिवाय रवीना टंडनची मुलगी राशा थडानीही या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात करत आहे. आता चित्रपटाचा टीझर आला आहे.
रवीना टंडनची मुलगी राशा थडानी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणही त्याची नवी इनिंग सुरू करतोय. अजय देवगणचा आजाद हा चित्रपट पुढच्या वर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. मात्र या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये महाराणा प्रताप आणि त्यांच्या शूर घोड्याची कथा दाखवण्यात आली आहे. टीझर खूपच आशादायक दिसत आहे.
अमन देवगणच्या 'आजाद' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा टीझर १ मिनिट ४७ सेकंदाचा आहे. या टीझरमध्ये व्हॉईस ओव्हरच्या माध्यमातून कथेची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. दृश्ये आणि कथनातून असे दिसते की, महान क्रांतिकारक योद्धा महाराणा प्रताप यांच्या घोड्याची कथा चित्रपटातून दाखवली जाणार आहे.
आजाद चित्रपटाची नेमकी रिलीज डेट देण्यात आलेली नाही. परंतु हा चित्रपट जानेवारी २०२५ मध्ये चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार असून अमन देवगणचा हा पहिला चित्रपट असेल.