राकेश बेदीने ‘धुरंधर पार्ट 2’ च्या रिलीज डेटचा खुलासा केला असून चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्यातही धमाल विनोद आणि मनोरंजनाची सांगड घालण्यात आली आहे.
Dhurandhar Part 2 release date announced
अभिनेता राकेश बेदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या लोकप्रिय चित्रपटाच्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राकेश बेदीने ‘धुरंधर पार्ट २’ बाबत संबंधित महत्त्वाचा खुलासा केला. चित्रपट कधी रिलीज होणार, याबाबत डेट अपडेट माहिती देण्यात आली आहे.
चित्रपट प्रदर्शित होताच निर्माते म्हणाले, "धुरंधर"ची कथा पुढे सरकत राहणार, कथा तिथेच संपणार नाही. प्रेक्षकांना आणखी ट्विस्ट, अॅक्शन आणि ड्रामा देण्यासाठी दुसरा भाग तयार करण्यात येणार आहे. निर्मात्यांनी स्वतः पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये ही घोषणा केली. त्यांनी दुसऱ्या भागाच्या रिलीजची तारीख देखील जाहीर केली, जो पुढील वर्षी येत आहे.
रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि सारा अली खान स्टारर चित्रपटाचा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी रिलीज होईल. दिग्दर्शक आदित्य धर आणि त्यांच्या टीमने दोन्ही भाग एकाच वेळी शूट केल्याचे म्हटले जाते. पहिला भाग स्वतःच अंदाजे ३ तास आणि ३० मिनिटांचा आहे, त्यामुळे आता दुसऱ्या भागाची उत्सुकता लागून राहिलीय. शिवाय किती मोठा असेल., कथा काय असेल याची प्रतीक्षा फॅन्सना नक्कीच लागून राहणार आहे.
अभिनेता राकेश बेदीची घोषणा
अभिनेता राकेश बेदी एका मुलाखतीत म्हणाला, 'धुरंधर २' लवकरच येईल. माझे अर्धे काम या भागात दाखवण्यात आले नाही. पण दुसऱ्या भागात ते रंजक असेल. चित्रपटाचा दुसरा भाग तयार असून एक-दोन महिने ला शकतात. दिग्दर्शक आदित्य धर हे आवडते दिग्दर्शक असल्यामुळे काम करणे आणखी अद्भूत आहे.