आगामी काळात ब्लॉकबस्टर सिनेमे रिलीज होण्यासाठी तयार आहेत. त्यापैकी एक आहे रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला धुरंधर. एका गुप्तहेराची गोष्ट असलेला हा सिनेमा ट्रेलर रिलीजपासूनच चर्चेत आहे. या सिनेमातील कलाकारांचा लूक आता समोर येतो आहे.
या सिनेमातील अर्जुन रामपालचा लूक समोर आला आहे. रणवीरने एंजल ऑफ डेथ हे कॅप्शन देत रणवीरहे हे पोस्टर शेयर केले आहे. या पोस्टरमध्ये अर्जुन लहान केस, लांब दाढी, काळा चश्मा अंगठी असा लूक आहे. हातात सिगार पकडलेल्या अर्जुनच्या डोळ्यातील थंडपणा थरकाप उडवतो आहे
हा सिनेमा येत्या 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. पण त्यापूर्वी 12 नोव्हेंबर ला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आदित्य धरने या सिनेमाची पटकथा लिहिली आहे तसेच दिग्दर्शन केले आहे