गतिकीकरणाच्या कोलाहलात ९० च्या दशकानंतर इंग्रजीच्या जा वाढत्या प्रभावाने मराठी माध्यमांच्या शाळांना ओहोटी लागली आहे. इंग्रजीत येस फेस केल्यावरच मुलांचे करिअर चांगले घडते आणि त्यांना बक्कळ पगाराच्या नोकऱ्या मिळतात. या ध्यासाने प्रेरित झालेले गरीबातले गरीब पालक पोटाला चिमटा काढून इंग्रजी शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेतात. त्यामुळे अनेक राजकारणातल्या शिक्षण महर्षीनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा बाजार सुरू केला. इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा, शाळा आणि मराठी संस्कृतीची होणाऱ्या गळचेपीवर 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटाने प्रकाश टाकला आहे.
रायगड जिल्ह्यातील नागावमध्ये असलेल्या क्रांतीज्योती विद्यालयाने १०० वर्षे पूर्ण केली आहेत. मराठी माध्यमाच्या या शाळेला संरचनात्मक तपासणीत (स्ट्रक्चरल ऑडिट) सरकारने धोकादायक जाहीर करून ही शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. सरकारच्या या फतव्याने शाळेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या, शाळेसाठी हयात देणारे मुख्याध्यापक दिनकर शिर्के (सचिन खेडेकर) अस्वस्थ झाले आहेत. यातून शाळेचे माजी विद्यार्थी वाट काढतील, असा गाढ विश्वास त्यांना आहे.
अनुपमा गुंडे
भूमिकाः सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिध्दार्थ चांदेकर प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपूटकर, निर्मिती सावंत, अनंत जोग, सायली संजीव, जितेंद्र जोशी
बॅनर : चलचित्र मंडळी, क्रेझी फ्यू फिल्मस
निर्माते : क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ
लेखन व दिग्दर्शन: हेमंत ढोमे
संगीत : हर्ष-विजय
गायक : रोहित राऊत, जुईली जो-गळेकर, रोहित जाधव, अनुजा देवरे
गीतकार : ईश्वर अंधारे
संकलन : भावेश तोडणकर
डीओपी : सत्यजीत शोभा श्रीराम
त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ठेकेदार बबन म्हात्रे (अमेय वाघ), अभिनेता कुलदीप नागवेकर (सिध्दार्थ चांदेकर), केंद्रीय सुरक्षा यंत्रणेत काम करणारी सलमा (क्षिती जोग) हॉटेल व्यावसायिक विशाल भोईर (पुष्कराज चिरपुटकर), त्याची पत्नी सुमन (कांदबरी कदम) आणि अंजली (प्राजक्ता कोळी) हे माजी विद्यार्थी एकत्र येतात. पण हे विद्यार्थी शाळेच्या निरोप समारंभाबद्दल चर्चा करतात, त्यामुळे आपल्या शाळेचीबद्दची व्यथा आणि तळमळ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही, यामुळे शिर्के सर हवालदिल होतात. पण शाळेच्या नार्वेकर बाई (निर्मिती सावंत) विद्यार्थ्यांना जाणीव करून देतात. त्यानंतर हे सगळे माजी विद्यार्थी जोमाने कामाला लागतात. शाळेच्या जागेवर इंटरनॅशनल स्कूल उभारण्यासाठी शासकीय यंत्रणा हाताशी धरणाऱ्या गावातील प्रतिष्ठित जगताप (अनंत जोग) विरोधात लढून आपली शाळा कशी वाचवतात, हे चित्रपटातच पाहणे उचित.
करमणुकीच्या माध्यमातून नाजूक विषय संवेदनशीलपणे मांडण्यात दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा हातखंडा आहे. या चित्रपटातही त्यांनी मरणपंथाला लागलेल्या मराठी शाळांचा विषय आतिशय संयतरित्या हाताळला आहे. मराठी भाषा, शाळा आणि मराठी माणसाच्या विषयात घुसलेल्या राजकारणाची हवा त्यांनी चित्रपटाला लागू दिली नाही. फक्त पूर्वाधात हा चित्रपट अतिशय संथ वाटतो. बाकी शाळेचे वातावरण, निसर्ग, माजी विद्यार्थ्यांची आठवणीतील मैत्री असा शाळेचा, मैत्रीचा माहोल सगळ्यांना शाळेच्या दिवसात घेऊन जातो. शाळेच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी अर्थात कलाकारांचा अभिनय लक्षवेधी झाला आहे.
अमेय वाघ याचा गावातला आगरी तरुण, अनाथ मुलगी ते आयपीएस ऑफिसर भूमिकेतील क्षिती जोग यांनी छान साकारली आहे. छोट्याश्या भूमिकेत नार्वेकर बाईच्या रूपातल्या निर्मिती सावंत लक्षात राहतात. शाळेवर निस्सीम प्रेम करणारा एक तत्ववादी, ध्येयवादी, शाळा बंद होणार या धास्तीने कासावीस झालेला मुख्याध्यापक सचिन खेडेकर यांनी तन्मयतेने उभे केले आहेत. जितेंद्र
जोशी शिक्षणमंत्र्यांच्या भूमिकेत छाप सोडून जातात. 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटाच्या रूपाने हेमंत ढोमे यांनी मराठी माध्यमांच्या शाळेच्या उतरत्या कळेवर प्रकाश टाकला आहे. काठी टेकवत चालणाऱ्या ज्येष्ठांपासून ते शाळा सोडून १० वर्षे झालेल्या माजी विद्यार्थ्यांपर्यंत आता गेट टुगेदरचे फॅड रंगते आहे.
या सो कॉल्ड गेट - टुगेदरमध्ये आपल्याला समृध्द करणाऱ्या शाळांची अवस्था विशेषत : मराठी शाळांची अवस्था कशी आहे. आंतराराष्ट्रीय शाळांच्या भाऊगर्दीत आपल्या मराठी शाळेला संजीवनी देण्यासाठी माजी विद्यार्थी महत्वाची भूमिका बजावू शकतात. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकूनही हजारो विद्यार्थी यशवंत, कीर्तीवंत झाले आहे. आपल्याला मोठं केलेल्या काही शाळांना सरकारी अनास्थेमुळे टाळे लागले आहे, तर काही शाळा मरणासन्न झाल्या आहे. आपल्या मराठी शाळांना संजीवनी देण्यासाठी प्रत्येक मराठी विद्यार्थ्यान हा चित्रपट पहायलाच हवा.
विशेषत : मराठी शाळांची अवस्था कशी आहे. आंतराराष्ट्रीय शाळांच्या भाऊगर्दीत आपल्या मराठी शाळेला संजीवनी देण्यासाठी माजी विद्यार्थी महत्वाची भूमिका बजावू शकतात. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकूनही हजारो विद्यार्थी यशवंत, कीर्तीवंत झाले आहे. आपल्याला मोठं केलेल्या काही शाळांना सरकारी अनास्थेमुळे टाळे लागले आहे, तर काही शाळा मरणासन्न झाल्या आहे. आपल्या मराठी शाळांना संजीवनी देण्यासाठी प्रत्येक मराठी विद्यार्थ्यान हा चित्रपट पहायलाच हवा.