मनोरंजन

राणी मुखर्जीचा ‘त्या’ कटू घटनेला उजाळा…

मोहन कारंडे

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी दुसर्‍यांदा आई होणार होती. पण, त्यापूर्वीच मिस कॅरेज झाल्याने तिचे स्वप्न अधुरे राहिले. स्वत: राणीने मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलदरम्यान हा खुलासा केला.

एरव्ही राणी आपल्या खासगी आयुष्याबद्दल फारसे बोलत नाही. पण, यावेळी प्रथमच तिने अशा घटनेला उजाळा दिला. 'कोव्हिड-19 च्या वेळी मी गर्भवती होते. पण, पाचव्या महिन्यात मिस कॅरेज झाले. यातून सावरणे खूप कष्टप्रद होते. मला त्यावेळी खूप त्रास झाला,' असे ती म्हणाली. आदित्य चोप्राशी विवाहबद्ध झालेल्या राणी मुखर्जीने 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आपण याबद्दल का जाहीर केले नाही, हे देखील यावेळी अधोरेखित केले. त्यावेळी मी या विषयावर बोलले असते तर चित्रपट प्रमोट करण्याचा हा स्टंट वाटला असता, असे ती म्हणाली. 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा चित्रपट यंदा 17 मार्च रोजी रीलिज झाला होता आणि तो सत्य घटनेवर आधारित होता.

SCROLL FOR NEXT