veteran stage actor passed away heart attack
मुंबई - अनेक कलाकार परफॉर्मन्स करताना स्टेजवर निधन पावले आहेत. आता आणखी एक वृत्त समोर आले आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा येथे 'रामलीला'चे सादरीकरण सुरु असताना एक दुर्घटना घडली. मंगळवार रात्री चंबाच्या प्रसिद्ध रामलीलामध्ये ७३ वर्षांचे अमरेश महाजन राजा दशरथ यांची भूमिका साकारत होते.
चंबामध्ये रामलीलावेळी राजा दशरथ यांचा दरबार भरलेला असतो. यावेळी अमरेश संवाद बोलू लागतात की- "मैं अपनी प्रजा के लिए अपने प्राण तक न्योछावर कर दूंगा..." आणि हा संवाद म्हणताना अचानक ते शेजारी बसलेल्या कलाकाराच्या खांद्यावर झुकतात. यावेळी तिथेच ते आपले प्राण सोडतात. सुरुवातीला कुणाला काहीच समजत नाही. पण, हे दृश्य कॅमेऱ्यात टिपले गेले आणि व्हायरल झाले.
अमरेश यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोरच प्रिय कलाकाराने प्राण सोडल्याने उपस्थित मंडळींना धक्का बसला.
video - Anku Chahar x account वरून साभार
कलाकार अमरेश महाजन मागील ४० वर्षांपासून रामलीलामध्ये राजा दशरथ यांची भूमिका साकारत आले होते. रंगमंचावर त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स, शानदार अभिनय प्रेक्षकांना रुंजी घालायचा.