Ramayana Box Office Collection Pudhari
मनोरंजन

Ramayana BO Collection: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! पहिल्याच दिवशी १० चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले; किती कोटी कमावले?

Ramayana Box Office Collection: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे.

Rahul Shelke

Ramayana Box Office Collection: रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, रावणाच्या भूमिकेत दिसणाऱ्या यशच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे.

तसेच रावण आणि जटायू यांच्यातील लढाईचा प्रसंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने केलेली कमाई पाहता बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे.

दुपारी २ वाजेपर्यंत किती कमाई?

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘रामायण’ने पहिल्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत २२.६० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन २६.६७ कोटी रुपये झाले होते. देशभरात चित्रपटाचे एकूण ११,६२१ शो आयोजित करण्यात आले होते. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता दिवसअखेर चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कोणत्या भाषेत किती कमाई?

‘रामायण’ चित्रपटाला हिंदीसह इतर भाषांमध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारी २ वाजेपर्यंत विविध भाषांमध्ये झालेली कमाई पुढीलप्रमाणे :

  • हिंदी : १६.०४ कोटी रुपये (९,४०४ शो)

  • कन्नड : ३.०२ कोटी रुपये (६४९ शो)

  • तेलुगू : २.२७ कोटी रुपये (८७३ शो)

  • तमिळ : ८८ लाख रुपये (४४२ शो)

  • मल्याळम : ३९ लाख रुपये (२५३ शो)

२०२६ मधील १० चित्रपटांना टाकले मागे

‘रामायण’ने पहिल्याच दिवशी २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांच्या ओपनिंग डे कमाईला मागे टाकले आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने खालील १० चित्रपटांना मागे टाकले आहे.

  1. भूत बंगला – १८.३१ कोटी रुपये

  2. द ओडिसी – १६.०७ कोटी रुपये

  3. धमाल – १५.५० कोटी रुपये

  4. कॉकटेल २ – १४.१० कोटी रुपये

  5. राजा शिवाजी – १२.४० कोटी रुपये

  6. अल्फा – ९.२५ कोटी रुपये

  7. है जवानी तो इश्क होना है – ८.६५ कोटी रुपये

  8. द वन – ८.१२ कोटी रुपये

  9. इक्कीस – ७.२८ कोटी रुपये

  10. पति पत्नी और वो दो – ४.३८ कोटी रुपये

चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे अंतिम आकडे रात्री साडेदहा वाजेपर्यंत समोर येणार आहेत. त्यामुळे दिवसअखेर ‘रामायण’ किती कोटींचा टप्पा गाठतो, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

‘रामायण’मध्ये कोणते कलाकार झळकले?

दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी ‘रामायण’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून नमित मल्होत्रा यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीरामांच्या भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेत्री साई पल्लवीने सीतेची भूमिका साकारली आहे.

याशिवाय यश रावणाच्या भूमिकेत, तर रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहे. विवेक ओबेरॉय, लारा दत्ता आणि रकुल प्रीत सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे, रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल या चित्रपटात राजा दशरथच्या भूमिकेत आहेत.

पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता रणबीर कपूरच्या ‘रामायण’कडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता चित्रपटाची अंतिम कमाई किती होते आणि तो आणखी कोणते विक्रम मोडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT