मुंबई - दूरदर्शनवरील नुक्कड मालिका आठवतेय का? या मालिकेतील टीचर जी मारियाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खूप कौतूक झाले होते. सध्या ती काय करते? पाहुया. टीव्ही लव्हर्सना ही मालिका आवडायचीच. एक काळ असा होता की, जेव्हा टीव्हीवर दूरदर्शन खेरीज इतर चॅनेल्स नव्हते. त्यावेळी दूरदर्शनवर ठरलेल्या वेळेत मालिका, चित्रपट, बातम्या प्रसारीत व्हायच्या. एक प्रसिद्ध मालिका यायची नुक्कड नावाची. १९८६ ते १९८७ पर्यंत ही मालिका प्रसारीत झाली होती. यातील सर्वच कलाकार घराघरात पोहोचले. पण अधिककरून लोकप्रिय भूमिका गाजली ती म्हणजे टीजर जी मारियाची.
ही भूमिका अभिनेत्री रमा विजने साकारली होती. या मालिकेत टीचर हे पात्र होते. तिच्या पात्राचे नाव मारिया होते. चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या रमा विजला खरी ओळख नुक्कड मालिकेतून मिळाली होती.
नुक्कडचे दिग्दर्शन कुंदन शाह आणि सईद अख्तर मिर्जाने केले होते. मध्यमवर्गीयांची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली होती, ज्यामध्ये दिलीप धवन गुरुच्या भूमिकेत होते. पण टीजर मारियाची भूमिका सर्वदूर पोहोचली. या मालिकेचे ४० एपिसोड प्रसारित झाले होते. कहाणी अशी होती की, टीचर जी एकटी होती. ती विधवा होती. गुरु आणि मारिया एकमेकांशी प्रेम करायचे, पण सर्वांसमोर ते आपले प्रेम आणू इच्छित नव्हते.
रमा विजने १९७७ मध्ये अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत टॅक्सी-टॅक्सीमधून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने १९७८ मध्ये शेखर कपूर यांच्या सोबत पल दो पल हिंदी चित्रपटात काम केलं. हिंदीसोबतच पंजाबी चित्रपटातही तिने अभिनय साकारला. 'चन्न परदेसी', 'कचहरी' राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केले. तर 'वीराना', 'प्रेम कैदी', 'जोशीले' या उत्तम हिंदी चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. रमा विजचा शेवटचा हिंदी चित्रपट हवाएं होता, जो २००३ मध्ये रिलीज झाला होता. तिचा शेवटचा पंजाबी चित्रपट खुशिया २०१२ मध्ये रिलीज झाला होता.
आता अभिनेत्री रमाने स्वत:ला अभिनयाच्या दुनियेपासून दूर ठेवलं आहे. पण ती चित्रपट इंडस्ट्रीशी संबंधित आहे. तिला वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात पाहण्यात येते. एक काळ असा होता की, तिने मालिका, चित्रपट गाजवले. त्यावेळी लोकांचे भरभरून प्रेम तिला मिळाले.