राम चरण आणि उपासना कोनिडेला यांनी आपल्या जुळ्या मुलांच्या नावांची घोषणा केली. त्सयांना याआधी एक Klin Kaara Konidela आहे. तिचा २० जून २०२३ रोजी जन्म झाला. आता जुळ्या मुलांचा नाव्ंचा अर्थ त्यांनी जाहीर केला आहे.
Ram Charan-Upasana Twin Baby Names and meaning
राम चरण आणि उपासना यांनी आपल्या जुळ्या मुलांच्या नावांची घोषणा केली. हैदराबादमध्ये आयोजित नामकरण समारंभात त्यांनी आपल्या मुलांच्या नावांचा अर्थ देखील सांगितला. दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण आणि उद्योजिका उपासना कोनिडेला यांनी आपल्या मुलांची नावे जाहीर केली आहेत. पण त्यांच्या मुलांची नावे युनिक आणि अर्थदेखील धार्मिक आणि सुंदर आहे.
३१ जानेवारी रोजी या कपलने जुळ्या मुलांचे स्वागत केले होते. त्याच्या मुलाचे नाव शिवराम ठेवण्यात आले आहे, हे नाव भगवान शिव आणि भगवान राम यांच्या प्रेरणेने आहे. राम चरणने सांगितले की, हे नाव करुणा आणि धार्मिकतेसह संतुलित शक्तीचे प्रतीक आहे, तसेच त्यांच्या वडिलांचे नाव शिवशंकर आहे.
तर मुलीचे नाव अन्वीरा देवी ठेवण्यात आले आहे. हे नाव धैर्य आणि दैवी स्त्री शक्तीचे प्रतिनिधित्व करते. चरणच्या मते, "वीरा" शौर्य दर्शवते, तर "अन" हे विशालता दर्शवते, ज्यामुळे हे नाव अमर्याद शक्तीचे प्रतिबिंब बनते. "देवी" चा समावेश कृपा आणि आध्यात्मिक शक्ती अधोरेखित करते.
उपासना म्हणाली की, आता मातृत्व आणि अधिक शांत - सचेत अनुभव आहे. पहिल्यांदा सर्व काही नवे असते. सुंदर पण थोडे कठीण देखील. यावेळी मी खूप अधिक शांतता अनुभवत आहे. मी अनेक गोष्टी सोडून देणे शिकले आहे. आता मी छोट्य़ा-छोट्या गोष्टींना घाबरत नाही.