मनोरंजन

राखी सावंतच्या आईची कॅन्सरशी झुंज

Pudhari News

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राखी सावंतने आपल्या आईचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आपल्या आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे. राखी सावंत 'बिग बॉस-१४' संपल्यानंतर बिग बॉस हाऊसच्या बाहेर आली आहे. आता पुन्हा आता ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाली आहे. तिने आपल्या आईचा फोटो शेअर केला असून कॅप्शन लिहिली आहे की, 'माझ्या आईसाठी प्रार्थना करा. माझी आई कॅन्सरवर उपचार घेत आहे.' 

वाचा – लग्नाचा वाढदिवस : अजय देवगनने शेअर केली हटके पोस्ट

राखीची आई जया सावंत कॅन्सरशी लढत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राखीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची आई बेडवर बसलेली दिसते. 

वाचा – आदेश बांदेकरांच्या मुलाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

२१ फेब्रुवारीला 'बिग बॉस-१४' चा ग्रँड फिनाले झाला होता. राखी सावंत शोची टॉप ५ कंटेस्टेंट्सपैकी एक होती. तिने १७ लाख रुपये घेऊन फिनालेच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. बिग बॉस हाऊस बाहेर पडल्यानंतर राखीने स्टेजवर सलमानला सांगितलं होतं की, ती जिंकलेली रकमेचे काय करणार आहे. 

राखीने सांगितलं होतं की, ही रक्कम ती आपल्या आईच्या उपचारासाठी खर्च करेल. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT