Rajkumar Rao struggling days
मुंबई - अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखाने गुड न्यूज दिलीय. लवकरच त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. तो अपनी ॲक्शन-थ्रिलर रिलीज चित्रपट 'मालिक'मुळेही चर्चेत आहे. दरम्यान, राजकुमार रावने आजपर्यंत जे यश मिळवलंय, त्याच्या मागे मोठी मेहनत आहे. खूप संघर्षानंतर तो इथवर पोहोचला आहे. कधी काळी असे दिवस असायचे की, रात्रीच्या जेवणालाही त्याच्याकडे पैसे नसायचे. त्यावेळी एखाद्या मित्राला फोन करून त्याच्या घरी जेवायला जावं का, असाही विचार त्याला यायचा. आज अभिनय क्षेत्रात जे यश मिळवलंय, ते त्याने शून्यातून उभं केलेलं आहे. जाणून घेऊया त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल.
एका मुलाखतीत राजकुमारने सांगितले होते, गुडगावमध्ये माझ्या कुटुंबात १५-१६ माणसे होती. आम्ही खूप चित्रपट पाहायचो. मी पहिला चित्रपट अग्निपथ पाहिला होता आणि खूप रडलो होतो. मी शाळेत डान्स, मार्शल आर्ट, नाटक सादर करायचो. कुठून हिम्मत झाली की, मी मुंबईला आलो. देवाच्या कृपेनेच मला अभिनयाचा मार्ग सापडला. १२ वी नंतर मी याकडे वळलो. मी एफटीआयला अर्ज केला आणि सुदैवाने तिथे प्रवेश मिळाला.
राजकुमार राव म्हणाला, ''पुण्यात मी बाईकवरून साहित्य घेऊन यायचो. एक सर्वात मोठा धक्का होता की, हे खूप महाग शहर होतं गुडगावच्या तुलनेत. मी माझ्या शाळा, कॉलेजमध्ये नाटक, डान्स करायचो. पदवीचे शिक्षण घेतान मी अभिनय शिकण्यासाठी खूप वेळ दिला. एफटीआयमध्ये जाऊन मी पाहिलं की, अभिनयाची दुनिया खूप मोठी आहे. खूप शिकलो. या सर्वांचे श्रेय माझ्या आई-वडिलांना जातं. त्यांनी खूप पाठिंबा दिला. ते माझे नाटके पाहायला यायचे.''
राजकुमार रावने २००८ मध्ये पुण्यात FTII मध्ये प्रवेश घेतला आणि मग मुंबईला आला. एका पॉडकास्टमध्ये राजकुमारने सांगितले होते की, जेव्हा FTII पासआऊट केलं, तेव्हा तो मुंबई आला, इथे सर्व्हाइव करणं खूप कठीण होतं.
तो म्हणाला, ''तुम्ही एफटीआयमध्ये शिकत असताना तुम्ही विद्यार्थी असता..तुम्ही चित्रपटात, शॉटर्स फिल्ममध्ये काम करत असता. मीही एक माझी स्टोरी केली होती. मी ठरवलं होतं की, दिवसातून ३-४ लोकांना भेटायचं होतं..दिग्दर्शक वगैर लोकांना आणि त्यांना आपले काम दाखवायचे. नंतर पैसेच उरलेले नसायचे. रात्री काय खाणार, अशी ही परिस्थिती यायची. पारलेजी, फ्रुटी खाऊन लंच करायचो. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हेच खायचो. कधी असा विचार यायचा की, अरे चला मित्राला फोन करुया, त्याच्या घरी जाऊन जेवूया. घरातून थोडेफार पैसे मिळायचे. त्यावेळी मी कामाच्या शोधात होतो.''
राजकुमारने सांगितलं की, ''२००९ च्या आसपास जेव्हा एक दिवसात त्याने १०-१० ठिकाणी ऑडिशन दिले होते. प्रवास करताना पैसे संपायचे. आणि अकाऊंटमध्ये केवळ १८ रुपये शिल्लक होते.''
राजकुमारला पहिली संधी मिळाली ती रामगोपाल वर्माचा चित्रपट रण (२०१०) मधून. पण त्यामध्ये त्याची छोटी भूमिका होती. २०१० मध्ये एकता कपूरचा चित्रपट LSD मध्ये त्याला मुख्य भूमिका मिळाली. पुढे गँग्स ऑफ वासेपुरच्या दोन्ही भागात तो दिसला. राजकुमार रावला खरी ओळख मिळाली ती काई पो चे (२०१३) मधून. फन्ने खा, शादी मे जरूर आना, मिस्टर एंड मिसेज माही यासारख्या चित्रपटातही तो झळकला.
राजकुमार राव फिल्मफेअर ॲवॉर्ड्स मराठी 2025 च्या रेड कार्पेटवर दिसला. व्हाईट टी-शर्ट लाईट ब्राउन कलर सूटमध्ये तो दिसला.