Rajkummar-Patralekhaa Welcome Baby Girl  Instagram
मनोरंजन

Rajkummar-Patralekhaa Welcome Baby Girl |लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला आनंदाचा वर्षाव, राजकुमार–पत्रलेखाच्या घरी कन्यारत्न

Rajkummar Rao Patralekhaa Welcome Baby Girl | लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला राजकुमारच्या घरी लक्ष्मीचं आगमन, पत्रलेखाने दिला गोंडस बाळाला जन्म

स्वालिया न. शिकलगार

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या घरी लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच गोंडस मुलीचा जन्म झाला. कन्यारत्नाच्या आगमनाने दोघांच्याही घरात आनंदाचे वातावरण असून, चाहते आणि सहकलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Rajkummar Rao Patralekhaa Welcome Baby Girl marriage anniversary

मुंबई - बॉलिवूडमधील सर्वाधिक आवडत्या कपल पैकी ल्या राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच पत्रलेखाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, फॅन्सकडून आनंदाचा वर्षाव सुरू आहे. या खास दिवशी कन्यारत्नाचे आगमन झाल्याने दोघांचाही आनंद ओसंडून वाहत आहे.

पत्रलेखाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती फॅन्सशी शेअर केली. ''आमच्या चौथ्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला परमेश्वराने आम्हाला सर्वात मोठा आशीर्वाद दिला आहे.'' तो फोटो काही क्षणांतच व्हायरल झाला आणि कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पत्रलेखा देखील मातृत्वाचा आनंद अनुभवत असून आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची प्रेमकहाणीला सुरुवात झाली ती 'सिटीलाईट्स' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान. दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी लग्न केले.

पत्रलेखाच्या प्रसुती आधी बेबी शॉवरचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावर राजकुमारने बेबी गर्लच्या स्वागताची वार्ता दिली, सोशल मीडियावर लोक त्याचे अभिनंदन करू लागले. पण प्रत्येकाचे लक्ष होते ते म्हणजे फराहच्या पोस्ट आणि कॅप्शनवर.

पत्रलेखा आई होताच फराह खानने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले. पहिल्या फोटोत स्टार कपल पत्रलेखा - राजकुमार राव दिसताहेत. दुसऱ्या फोटोत मित्रांसमवेत दिसताहेत. तिसऱ्या फोटोमध्ये बेबी क्रॅडल आणि खेळणींसोबत पोज देत आहेत. आणखी एका फोटोत बेबी शॉवरच्या मेन्यूची झलक देखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT