सुपरस्टार रजनीकांत आणि सूर्या file photo
मनोरंजन

'रेट्रो' चित्रपटाची सुपरस्टार रजनीकांत यांनाही भुरळ, थलायवाकडून तोंडभरून कौतुक

Rajinikanth reviews Retro movie: दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज यांनी 'X' वर दिली माहिती

Asit Banage

Rajinikanth reviews Retro movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित 'रेट्रो' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे सुपरस्टार रजनीकांत यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी 'रेट्रो'चे खूप कौतुक केले आहे.

चित्रपटाबद्दल काय म्हणाले रजनीकांत ?

चित्रपटाचे दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज यांनी ट्विटरवर रजनीकांतचे शब्द शेअर केले आहेत. यामध्ये ते लिहितात की, "थलाईवरने 'रेट्रो' पाहिला आणि त्याला तो खूप आवडला. त्याचे शब्द होते - 'संपूर्ण टीमचा उत्तम प्रयत्न... सूर्याचा अभिनय उत्कृष्ट आहे... शेवटचे ४० मिनिटे अद्भुत आहेत... हास्याचा तडका उत्कृष्ट आहे...' मी आनंदाने उडत आहे... असे रेट्रो चित्रपटाबद्दल सुपरस्टार रजनीकांत यांनी म्हटले आहे.

तामिळनाडूत 'या' ठिकाणी मिळतोय चांगला प्रतिसाद

'रेट्रो' चित्रपटाला तामिळनाडू बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येतंय. या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे ३७ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाला तामिळनाडूमध्ये चेन्नई, कोइम्बतूर आणि मदुराई सारख्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला, चित्रपटगृहे ८०% पेक्षा जास्त प्रेक्षकांनी भरत आहेत.

सूर्याचा 'कांगुआ' ठरला होता फ्लॉप

यापूर्वी सूर्या 'कांगुआ' चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला. आता रेट्रो या चित्रपटातील सूर्याचा गँगस्टर लूक प्रेक्षकांना खूपच आवडतोय. या चित्रपटात पूजा हेगडे देखील प्रमुख भूमिकेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT