पुढारी ऑनलाईन डेस्क - फँड्री चित्रपटातू प्रसिद्धीच्या झोतात आलेली राजेश्वरी खरात हिचा एक नवा फोटो व्हायरल झाला आहे. पाण्यामध्ये ती हात जोडून उभी असलेली दिसतेय. सोबतचं राजेश्वरी खरातने 'Baptised' असे फोटोला कॅप्शन लिहून तिने हार्ट इमोजी शेअर केलाय. 'Baptised' याचा अर्थ बाप्तिस्मा असा होत आहे. (बाप्तिस्माचा अर्थ - वैयक्तिकरित्या बायबलच्या आज्ञेनुसार प्रभू येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून मी पूर्ण अंत:करणाने स्वीकारते)
‘Baptised’ म्हणजेच बाप्तिस्मा – बाप्तिस्मा घेतल्याचा अर्थ असा की, ती व्यक्ती आता नवी आध्यात्मिक सुरुवात करत आहे, प्रभु येशूच्या मार्गावर चालायचं ठरवत आहे. राजेश्वरीने अशा प्रकारे हा फोटो शेअर करत तिच्या वैयक्तिक जीवनातले एक महत्त्वाचे पाऊल सर्वश्रृत केले आहे.
राजेश्वरी खरात फोटोमध्ये अतिशय शांत दिसत आहे. भक्तिभावाने भरलेला तिचा लूक लक्षवेधी असून पाण्यात हात जोडून ती उभी असलेली दिसते. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत. काहींनी “गॉड ब्लेस यू” अशी कमेंट केली आहे, तर काहींनी “नवा अध्याय शुभ असो” अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
‘फँड्री’नंतर तिची प्रचंड लोकप्रियता वाढली. मराठी सिनेसृष्टीत तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.