Movie Raja Shivaji teaser with dhurandhar 2 in the theatre  instagram
मनोरंजन

Movie Raja Shivaji: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची पहिली झलक; 'धुरंधर २' पाहणाऱ्या प्रेक्षकांना मिळालं खास सरप्राईज!

Raja Shivaji | ‘धुरंधर द रिवेंज’ फॅन्ससाठी सरप्राईज! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक थेट थिएटरमध्ये

स्वालिया न. शिकलगार

Movie Raja Shivaji teaser with dhurandhar 2 in the theatre

अभिनेता रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा फर्स्ट लूक अखेर प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटात रितेश देशमुख स्वतः महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

हे 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी खरोखरच मोठे सरप्राईज आहे! 'धुरंधर २' च्या प्रदर्शनासोबतच रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची पहिली झलक पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरली आहे. ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ आता पहिल्या दमदार टीझर सोबत प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीजर डिजिटल प्लॅटफॉर्मवर नाही तर केवळ चित्रपटगृहात रिलीज केला गेला. निर्मात्यांनी ‘धुरंधर द रिवेंज’ सोबत या चित्रपटाचा टीझर अॅटॅच केला आहे, पेड प्रीव्यू १८ मार्चपासून सुरू झाले आहेत. धुरंधर-२ पाहताना राजा शिवाजी चित्रपटाच्या टीझरमध्ये कहाणीची भव्य झलक पाहायला मिळतेय.

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतीक्षित 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार फर्स्ट लूक टीझर रिलीज झाला आहे. हा खास अनुभव केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाची सिनेमॅटिक झलक मोठ्या पडद्यावर पाहणे सुंदर अनुभव असणार आहे. रितेश विलासराव देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात भारतातील एका महान योद्धाची गाथा, त्याचा स्वराज्य स्थापनेचा संघर्ष फर्स्ट लूक टीझरमधून पहता येणार आहे.

संगीत अजय-अतुल यांचे आहे. छायाचित्रकार संतोष सिवन यांनी आपल्या अप्रतिम छायाचित्रणातून या गाथेला भव्य दृश्यरूप दिले आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख निर्मित 'राजा शिवाजी' हा चित्रपट १ मे २०२६ रोजी रिलीज होईल. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT