Raja Shivaji Box Office Collection Day 18 Worldwide Pudhari
मनोरंजन

Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'ने जगभरात रचला इतिहास; 18 दिवसांत मोडले सर्व रेकॉर्ड, किती कोटी कमावले?

Raja Shivaji Box Office Collection Day 18 Worldwide: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Raja Shivaji Box Office Collection Day 18 Worldwide: राजा शिवाजी हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः राज्य करताना दिसतोय. नवे चित्रपट रिलीज होऊनही या ऐतिहासिक चित्रपटाची घोडदौड थांबलेली नाही. उलट, रिलीजच्या 18व्या दिवशी या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. आता हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.

18व्या दिवशी किती कमाई?

प्रेक्षकांकडून पहिल्या दिवसापासूनच ‘राजा शिवाजी’ला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 11.35 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती.

पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 52.65 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात आणखी 24.30 कोटी रुपयांची भर पडली.

तिसऱ्या आठवड्यातही सिनेमाची पकड मजबूत दिसली. 15व्या दिवशी चित्रपटाने 1.45 कोटी, 16व्या दिवशी 2.70 कोटी, तर 17व्या दिवशी 3.45 कोटी रुपयांची कमाई केली. आता सुरुवातीच्या अंदाजानुसार, 18व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या सोमवारी चित्रपटाने सुमारे 1.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यामुळे भारतातील या सिनेमाची एकूण नेट कमाई आता 85.70 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

जगभरात रचला इतिहास

2016 मध्ये सैराट या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला पहिला 100 कोटींचा वर्ल्डवाइड टप्पा पार करून दिला होता. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात जवळपास 110 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि तो अनेक वर्षे मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.

मात्र, तब्बल 10 वर्षांनंतर ‘राजा शिवाजी’ने हा विक्रम मोडला आहे. मेकर्सनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, या सिनेमाने जगभरात 114.8 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे ‘सैराट’ला मागे टाकत ‘राजा शिवाजी’ आता मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

‘राजा शिवाजी’मध्ये कोणते कलाकार?

या ऐतिहासिक चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केलं आहे. निर्मिती जेनेलिया डिसूजा आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

त्यांच्यासोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोले गुप्ते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘राजा शिवाजी’ची कमाई पाहता, मराठी सिनेसृष्टीसाठी हा चित्रपट एक नवा बेंचमार्क ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT