पुढारी ऑनलाईन डेस्क - अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा राजकीय थ्रिलर (Raid 2) 1 मे 2025 रोजी कामगार दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. 2018 च्या ॲक्शन सिक्वेलमध्ये पुन्हा आयआरएस अधिकारी अमय पटनायकची भूमिका दिसणार आहे, तर रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी एक शानदार ट्रेलर रिलीज केला आहे. हा चित्रपट सस्पेन्सने भरपूर आहे.
ट्रेलरमध्ये अजय देवगण भ्रष्ट राजकारणी दादा मनोहर भाई यांची भूमिका साकारणाऱ्या रितेश देशमुखच्या घरावर छापा टाकताना दिसत आहे. चित्रपटाचे दमदार डायलॉग पाहायला मिळताहेत. अजय म्हणतो, "चक्रव्यूह में फसोगे तो गुस्सा आएगा ही.” तेव्हा रितेश म्हणतो, ''ये पांडव कब से चक्रव्यू रचने लगे.” अजय म्हणतो, ”मैंने कब कहा कि मैं पांडव हूं, मैं पूरी महाभारत हूं.”
ब्लॉकबस्टर सिक्वेलमध्ये वाणी कपूर, सौरभ शुक्ला, रजत कपूर, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक, अमित सियाल हे कलाकार आहेत. Raid 2 ची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरीज प्रस्तुत करत आहे आणि पॅनोरमा स्टुडिओची निर्मिती आहे. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट १ मे, २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अजय देवगण 'दे दे प्यार दे 2' मध्ये रकुल प्रीतसोबत दिसणार आहे. अजयही दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करणार आहे. अभिनेत्याने मृणाल ठाकूरसोबत 'सन ऑफ सरदार 2'चे शूटिंगही सुरू केले आहे.