Rahul Deshpande Divorce
मुंबई : आपल्या मधुर आवाजाने अनेकांच्या मनावर मोहिनी घालणारे गायक राहुल देशपांडे यांनी वैयक्तिक आयुष्याबाबत पोस्ट शेयर करत धक्का दिला आहे. राहुल आणि पत्नी नेहा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी ही माहीती चाहत्यांशी शेयर केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, प्रिय मित्रांनो तुम्ही प्रत्येकजण माझ्या प्रवासाचा अर्थपूर्ण भाग आहात. त्यामुळेच एक महत्त्वाची आणि वैयक्तिक गोष्ट शेयर करतो आहे. 17 वर्षांच्या अविस्मरणीय सहजीवनानंतर मी आणि नेहाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचा स्वतंत्र प्रवास सुरू झाला आहे. आमच्या कायदेशीररित्या वेगळे होण्याची प्रक्रिया सप्टेंबर 2024 मध्ये पूर्ण झाली. मी हे सगळे तुमच्याशी शेयर करण्यापूर्वी वेळ घेतला. करण या बदलावर मला वैयक्तिक वेळ द्यायचा होता. सगळेकाही विचारपूर्वक आखले गेले आहे. विशेषत: आमची मुलगी रेणुका हिच्याबाबत. ती प्राथमिकता आहे. मी आणि नेहाने तिचे सहपालकत्व स्विकारले आहे.
राहुल देशपांडे पुढे म्हणतात, व्यक्ती म्हणून आमचा प्रवास वेगळा होत असला तरी पालक म्हणून आम्ही एकमेकांचा आदर करतो. तुम्ही दाखवत असलेल्या समंजसपणाचा आणि आमच्या निर्णयाच्या सन्मानाचा मी आदर करतो.’
राहुल त्यांच्या गायनासाठी लोकप्रिय आहेच. याशिवाय अलीकडेच त्यांनी अभिनय क्षेत्रातही चमक दाखवली आहे. मागील वर्षी मार्चमध्ये अमलताश या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील 'सरले सारे' या गाण्यासाठी त्यांना यंदाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता
नुकताच राहुल यांनी एक व्हीडियो शेयर केला होता. त्यात त्यांची लेक रेणुका, पत्नी नेहा आणि आई दिसत आहेत. या सगळ्यामध्ये राहुल यांनी अचानक पोस्ट शेयर केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
राहुल देशपांडेंचा विवाह कधी झाला होता?
राहुल देशपांडेंचा विवाह 22 नोव्हेंबर 2008 रोजी झाला होता. आमचं अरेंज मॅरेज होतं, असं राहुल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. नेहा या इलेक्ट्रिक अभियंत्या आहेत.