राहत फतेह अली खान  Pudhari File Photo
मनोरंजन

Rahat Fateh Ali Khan : राहत फतेह अली खान यांनीच केले अटकेच्या अफवांचे खंडण; पहा व्हिडियो

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना अटक झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. त्यांचे माजी व्यवस्थापक सलमान अहमद यांच्या तक्रारीवरून त्यांना अटक करण्यात आली. राहत फतेह अली खान याला दुबईतील बुर्ज दुबई पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. असेही या वृत्तांमध्ये म्हटले होते. या प्रकरणाला फेटाळत खान यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन या सर्व गोष्टी चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. त्यांना कुठेही अटक झालेली नाही. असे या व्हिडीयोमधून सांगण्यात आले आहे.

राहत फतेह अली खान यांना त्यांचे माजी व्यवस्थापक सलमान अहमद यांच्या बदनामीच्या तक्रारीवरून अटक करण्यात आल्याचे वृत्त सध्या व्हायरल होत आहे. ते वृत्त त्यांनी फेटाळून लावले आहे. याबद्दल त्यांनी बोलताना म्हणाले तुम्ही माझी शक्ती आहात. माझे प्रेक्षक आणि चाहते ही माझी शक्ती आहेत. असेही त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या वर्षामध्ये एका वादामुळे राहत फतेह अली खान चर्चेत आले होते. राहत फतेह अली खान हे जगप्रसिद्ध कव्वाली गायक नुसरत फतेह अली खान यांचे पुतणे आहेत. खान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT