पुढारी ऑनलाईन डेस्क : थायलँडच्या बँकॉकमध्ये MGI हॉलमध्ये वर्ल्ड फायनल दरम्यान पेरूच्या लुसियाना फस्टरने भारतीय मॉडेल Rachel Gupta ला मुकूट घातला. रेचल मिस ग्रँड इंटरनॅशनलचा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. तिने थायलंडमध्ये इतिहास घडवला आहे. या सोहळ्यात फिलीपिन्सची क्रिस्टीन जूलियन ओपियाजा फर्स्ट रनर-अप, म्यानमारची थाई सु न्येन, फ्रान्सची सफीतो कबेंगेले आणि ब्राझिलची तलिता हार्टमॅन ठरल्या.
रेचल एक मॉडल, अभिनेत्राी आणि बिझनेसवुमन आहे. तिची उंची ५ फूट १० इंच आहे. इंग्रजी, हिंदी, पंजाबी भाषेत ती पारंगत आहे. या इंटरनॅशनल सोहळ्याआधी रेचलने ११ ऑगस्ट रोजी जयपूरमध्ये आयोजित ग्लॅमानंद सुपरमॉडल इंडिया २०२४ मध्ये मिस ग्रँड इंडिया २०२४ चा किताब मिळवला होता.