Dhanush angry on Raanjhanaa AI Climax  Instagram
मनोरंजन

Raanjhanaa Dhanush | 'चित्रपटाचा आत्माच गेल्यासारखं वाटतं'; 'रांझणा'चा AI क्लायमॅक्स पाहून धनुष चिंतेत

Dhanush Raanjhanaa AI Climax | 'चित्रपटाचा आत्माच गेल्यासारखं वाटतं'; 'रांझणा'चा AI क्लायमॅक्स पाहून धनुष चिंतेत

स्वालिया न. शिकलगार

एआयच्या माध्यमातून 'रांझणा'चा क्लायमॅक्स बदलण्याने धनुष भडकला आहे. मी मनाई केल्यानंतरही रांझणाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला आहे.

मुंबई - १० वर्षांनंतर दिग्दर्शकांनी 'रांझणा' या चित्रपटाचा सीक्वल आणला आहे. 'रांझणा'च्या सीक्वलमध्ये धनुष मुख्य भूमिकेत आहे. पण धनुषला या चित्रपटाचा क्लायमॅक्स अजिबात पसंतीस पडलेला नाही. त्याने नराजी तर व्यक्त केलीच आहे शिवाय कलाकारांसाठी आणि चित्रपटाच्या कथेसाठी किती धोकादायक आहे, याबाबत चिंता व्यक्त केलीय. नेमकं चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये काय दाखवले आहे?

काय म्हणाला धनुष?

धनुष म्हणाला, ''AI च्या मदतीने बदललेल्या क्लायमॅक्स सोबत रांझणा रि-रिलीजने मला आतून खूप दु:खी केलं आहे. नव्या क्लायमॅक्स मध्ये चित्रपटाची खरी भावनाचं संपुष्टात आणलीय. मी यावर आक्षेप दर्शवला होता, तरीही याच्याशी संबंधित लोकांनी बदल केला. आता तो चित्रपट राहिला नाही. ज्यासाठी मी १२ वर्षांपूर्वी माझं मन आणि मेहनत लावली होती. कोणत्याही चित्रपट वा त्याची कथा बदलण्यासाठी एआयचा वापर करणे, हे केवळ त्या कलेसाठीच नाही तर कलाकारांसाठी देखील धोकादायक आहे...मला वाटतं की, भविष्यात अशा गोष्टी थांबवण्यासाठी कडक नियम बनवावेत.''

रांझणा ठरला होता ब्लॉकबस्टर

साऊथ सुपरस्टार धनुष -बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर स्टारर चित्रपट 'रांझणा' २०१३ मध्ये रिली ज झाला होता. आनंद एल राय दिग्दर्शित चित्रपट 'रांझणा' ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. आता १० वर्षानंतर या चित्रपटाचा सीक्वल आलाय. यामध्ये धनुष मुख्य भूमिकेत आहे. पण सीक्वलमध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. AI चा वापर करून चित्रपटाचा दु:खद क्लायमॅक्स हॅप्पी एंडिंगमध्ये बदलण्यात आलं. जो धनुषला अजिबात आवडला नाहीये.

तमिळ व्हर्जन 'अंबिकापथी'ने बदलला क्लायमॅक्स

१ ऑगस्टला रांझणाचे तमिळ व्हर्जन, 'अंबिकापथी' पुन्हा रिलीज करण्यात आला. चित्रपटात AI वापरून चित्रपटाच्या शेवटी कुंदन म्हणजेच धनुषची मृत्यू होत नाही. थिएटरमधून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चित्रपटाचे क्लायमॅक्स पाहून प्रेक्षक आनंदाने ओरडताना दिसताहेत.

या चित्रपटाचा क्लायमॅक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, सिवाय नटकऱ्यांकडून कॉमेंट्सही येऊ लागले. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, जोया (सोनम कपूर) कुंदन (धनुष) च्या शेजारी बसली आहे. कुंदन श्वास घेऊ लागतो. मुरारी (मोहम्मद जीशान अय्यूब) आणि बिंदिया (स्वरा भास्कर) त्याला पाहत असतात. कुंदन जीवंत असल्याचे पाहिल्यानंतर ते हसतात. व्हिडिओमध्ये दिसते की, जेव्हा कुंदनला शुद्ध येतेत, तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT