पुढारी ऑनलाईन डेस्क : पहिला नशा पहिला खुमार, नया प्यार है, नया इंतजार!!! हे गाणं प्रत्येकाचा आयुष्यातल्या प्रेमासाठी आहे. मात्र, या गाण्याचा रिअल हिरो म्हणजेचं आमिर खानच्या चा खऱ्या आयुष्यात सुद्धा हे गाणं सुरू आहे. हो … आमिरची नवी लव्ह स्टोरी सुरू झाली आहे .. परफेकशनिस्ट खानच्या आयुष्यात एका नवी लव्ह स्टोरी सुरू झाली आहे . बरं हे आम्ही नाही तर खुद्द आमिर खानने सांगितलं आहे …
मिस्टर परफेकशनिस्ट अशी बिरूदावली मिळालेला बॉलीवूडचा अभिनेता आमिर खानने आज (दि. १४) त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसापूर्वी त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज दिले आहे. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या गौरी स्प्रेटला डेट करत असल्याचे त्याने मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी दोघांनीही एकमेकांबद्दल काही गोष्टी शेअर केल्या.
यावेळी आमिरने त्याचा नव्या प्रेम कहाणी बाबत माहिती दिली. आमिरच्या या नव्या गर्लफ्रेंडचं नाव आहे गौरी स्प्रेट. गेली २५ वर्ष आमिर आणि गौरी एकमेकांना ओळखतात . गेली दीड वर्ष हे दोघे ही एकमेकाला डेट करत आहेत.
आमिरचे पहिले लग्न रीना दत्ता सोबत झाले होते. आमिर आणि रीनाला दोन मुले आहेतय इरा आणि जुनैद अशी त्यांची नावे आहेत. तर आमिरचे दुसरे लग्न दिग्दर्शिका किरण राव सोबत झाले. आमिर आणि किरनला एक मुलगा आहे, त्याचे नाव आझाद आहे. नुकतेच काही महिन्यापूर्वी आमिर- रीना आणि किरन एकत्र आमिर आणि रीनाची मुलगी आयराच्या लग्नात एकत्र दिसले होते.
गौरीची आई तमिळ आहे. तर तिचे वडील आयरिश आहेत. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. आईचे नाव रीटा स्प्रेट असून ती एक व्यावसायिक महिला आहे. गौरीला सहा वर्षांचा मुलगा आहे. तिने लंडनमधून शिक्षण घेतले आहे. ती फॅशन आणि स्टाईलच्या जगात तज्ज्ञ आहे. लंडनमधील कला विद्यापीठातून तिने फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे.